AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suicide Attempt | सावकाराच्या जाचाला कंटाळून विषप्राशन, पंढरपुरात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सावकाराच्या जाचाला कंटाळून पंढरपूर जवळच्या वाखरी येथील परमेश्वर ‌पोरे या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

Suicide Attempt | सावकाराच्या जाचाला कंटाळून विषप्राशन, पंढरपुरात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
पंढरपुरात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्नImage Credit source: टीव्ही 9
| Edited By: Anish Bendre | Updated on: May 15, 2022 | 10:46 AM
Share

सोलापूर : सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न (Suicide Attempt) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात (Solapur Pandharpur Crime News) हा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्याने विष प्राशन (Poison) करताना फेसबुक लाईव्ह केले होते. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उमटली आहे. सावकाराने परस्पर शेत विकल्याच्या कारणावरुन शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

मागील काही दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, सावकाराच्या जाचाला कंटाळून पंढरपूर जवळच्या वाखरी येथील परमेश्वर ‌पोरे या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

लाईव्ह व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल

संबंधित शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर पंढरपूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करत असल्याचा लाईव्ह व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. या घटनेने पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सावकाराने परस्पर शेत विकल्याने टोकाचं पाऊल

शेतकऱ्याच्या पोटी पुन्हा जन्माला येणार नाही, सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाही असे म्हणत वैफल्यग्रस्त झालेल्या एका तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर आता सावकाराने परस्पर शेत विकल्याच्या कारणाने परमेश्वर पोरे या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न करत असतानाचा व्हीडिओ व्हायला झाला आहे. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे

Follow Us
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?