Kalyan Fake Notes : कल्याणमध्ये नकली नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, दोन लाख रुपयांच्या नकली नोटा पोलिसांनी केल्या जप्त

| Updated on: Jul 26, 2022 | 12:22 AM

आरोपींकडून 200 रुपयांच्या 2 लाखाच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीचा मुख्य सूत्रधार दिल्लीती आहे. नोटा बाजारात चालवण्याचे काम या तिघांकडे होते.

Kalyan Fake Notes : कल्याणमध्ये नकली नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, दोन लाख रुपयांच्या नकली नोटा पोलिसांनी केल्या जप्त
कल्याणमध्ये नकली नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश
Image Credit source: tv9
Follow us on

कल्याण : कल्याणमध्ये नकली नोटांच्या रॅकेट (Racket)चा महात्मा फुले पोलिसांनी भांडाफोड केला आहे. नकली नोटा (Fake Notes) बाजारात चलनात वापरणाऱ्या तिघांना महात्मा फुले पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार दिल्लीत राहत असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मोहम्मद अरिफ, सुरज पुजारी आणि करण रजक अशी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत. हे तिघेही कल्याणमधील पत्री पूल परिसरात राहतात. आरोपींनी या नोट्या दिल्लीहून आणल्याचे पोलीस चौकशीत सांगितले. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस अधिक तपास करीत आहेत.

लॉजवर धाड टाकत पोलिसांनी नकली नोटांसह आरोपींना अटक केले

तिघे जण नकली नोटा घेऊन कल्याण पश्चिमेतील अनिल पॅलेज लॉजमध्ये थांबले असल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी दीपक सरोदे यांच्या पथकाने लॉजवर छापा टाकत या तीन आरोपींना अटक केली. आरोपींकडून 200 रुपयांच्या 2 लाखाच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीचा मुख्य सूत्रधार दिल्लीती आहे. नोटा बाजारात चालवण्याचे काम या तिघांकडे होते. यापैकी सुरज पुजारी हा हमाल आहे तर करण रजक हा रिक्षा चालक आहे. मोहम्द आरिफ हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये आला आहे.

मुख्य सूत्रधार दिल्लीत असून त्याचा शोध सुरु

तिघेही आरोपी बाजारात काही वस्तू खरेदी केल्यानंतर त्या बदल्यात या नकली नोटा द्यायचे. त्या बदल्यात मिळणारा नफा स्वतःकडे ठेवायचे आणि मूळ हिस्सा म्हणून खऱ्या नोटा मुख्य सूत्रधाराला द्यायचे. आरोपींनी आतापर्यंत किती नोटा बाजारात चालवल्या आहेत आणि कुठे कुठे खरेदी केली याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. (Mahatma Phule police seized fake notes worth Rs 2 lakh in Kalyan)

हे सुद्धा वाचा