बाप आहे की कसाई? दीड वर्षाच्या मुलीला छतावर नेत गळफास लावण्याचा प्रयत्न, अडीच तास हाय व्होल्टेज ड्रामा

मध्यप्रदेशच्या रायसेन जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पित्याने आपल्या दीड वर्षाच्या लेकीच्या गळ्यात साडीने फास बांधून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

बाप आहे की कसाई? दीड वर्षाच्या मुलीला छतावर नेत गळफास लावण्याचा प्रयत्न, अडीच तास हाय व्होल्टेज ड्रामा
प्रातिनिधीक फोटो

भोपाळ : मध्यप्रदेशच्या रायसेन जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पित्याने आपल्या दीड वर्षाच्या लेकीच्या गळ्यात साडीने फास बांधून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली. पोलिसांनी मोठ्या शिताफीने दीड वर्षांच्या मुलीचा जीव वाचवला. चिमुकलीचे प्राण वाचवल्याने मध्यप्रदेशचे पोलीस महासंचालकांनी ट्विटरवर रायसेन पोलिसांचं कौतुक केलं आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. पोलिसांनी आरोपी पित्यावर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

कोतवाली रायसेन पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यास असलेला 35 वर्षीय जगदिश कुशवाह याने आपल्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्याने पत्नीची नजर चुकवून दीड वर्षाच्या लहान मुलीला घराबाहेर आणलं. तो मुलीला घेऊन संतोष कुशवाह याच्या शेतात असलेल्या घराच्या छतावर घेऊन गेला. त्यानंतर त्याने पोटच्या मुलीच्या गळ्यात साडीने फास बांधला. त्यानंतर तो त्याच्याजवळ असलेल्या शस्त्राने तिची हत्या करण्याचा प्रयत्न करत होता.

प्रत्यक्षदर्शीचा पोलिसांना फोन

यावेळी काही स्थानिकांनी त्याला मुलीसोबत असं कृत्य न करण्याचं आवाहन केलं. त्यांनी मुलीला घेऊन खाली उतरण्याची विनंती केली. पण तो ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. यावेळी त्याने हायव्होल्टेज ड्रामा केला. यावेळी प्रत्यक्षदर्शींपैकी एकाने 100 क्रमांकावर फोन करुन पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

मुलीला सुखरुप सोडण्याचं पोलिसांचं आवाहन

आरोपी जगदिश कुशवाह हा पोलीस आल्यानंतरही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो आपल्या मुलीच्या गळ्यात फास बांधून तिची हत्या करणार असल्याचं बोलत होता. यावेळी त्याला अनेकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी देखील त्याला तसं न करण्याची विनंती केली. त्याला काय हवंय, असं विचारत त्याला मुलीला सुखरुप छताखाली आणण्याचं आवाहन केलं. पण तो ऐकत नव्हता. अखेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला पोलिसी खाक्या दाखवत मुलीला ताब्यात घेतलं. त्यानंतर आरोपीने थेट छतावरुन खाली उडी मारली. छतावरुन थेट खाली उडी मारल्याने त्याला मोठी जखम झाली नाही.

आरोपीने असं कृत्य का केलं?

पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतलं. अखेर या प्रकरणी चिमुकलीच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने तसं का केलं? यामागचं कारण समोर आलं. खरंतर आरोपीची गेल्या काही दिवसांपासून आर्थिक परिस्थिती वाईट झाली आहे. याशिवाय त्याचं वारंवार पत्नीसोबत भांडण सुरु होतं. त्यातूनच त्याने तसं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा :

एकत्र जीव देऊया, प्रेयसीला भुलवलं, विषारी गोळ्यांनी तरुणीचा मृत्यू, प्रियकर नामानिराळा

हातात नारळ देऊन आईला म्हणाला ‘ओम नमः शिवाय’ म्हण, माऊलीने डोळे मिटताच पोटच्या पोराने विहिरीत ढकललं

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI