Nalasopara Crime : नालासोपाऱ्यात गावगुंडाची दहशत, अज्ञात कारणावरुन इसमाला मारहाण, घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद

नालासोपारा पूर्वेला शिर्डी नगर येथे काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अजय मिश्रा हा गुंड त्याच्या इतर साथीदारांना घेऊन आला. त्यानंतर त्याने आदर्श राय या व्यक्तीला आधी अतिशय अश्लील भाषेत शिवीगाळ सुरु केली.

Nalasopara Crime : नालासोपाऱ्यात गावगुंडाची दहशत, अज्ञात कारणावरुन इसमाला मारहाण, घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद
गोंदियात नाल्यात चार जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले
विजय गायकवाड

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 07, 2022 | 4:32 PM

नालासोपारा : नालासोपाऱ्यात गावगुंडां (Goons)ची दहशत दिवसागणिक वाढत चालली आहे. काही गुंडांनी मिळून एका व्यक्तीला मारहाण (Beating) केल्याची घटना नालासोपाऱ्यात काल रात्री घडली आहे. आदर्श राय असे मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मारहाणीचा घटना मोबाईल कॅमेऱ्या (Mobile Camera)त कैद झाली आहे. मारहाण का केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती मिळताच आचोळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुंडावर पोलिसांचा धाक शिल्लक राहिला आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अश्लील शिवीगाळ करत मारहाण

नालासोपारा पूर्वेला शिर्डी नगर येथे काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अजय मिश्रा हा गुंड त्याच्या इतर साथीदारांना घेऊन आला. त्यानंतर त्याने आदर्श राय या व्यक्तीला आधी अतिशय अश्लील भाषेत शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. मात्र या गुंडांनी या व्यक्तीला मारहाण का केली हे अद्याप कळू शकले नाही. यावेळी तेथे उपस्थित नागरिकांनी या मारहाणीचे चित्रण आपल्या मोबाईलमध्ये केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मारहाणीची माहिती मिळताच आचोळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

नालासोपाऱ्यात गर्दुल्यांचाही उच्छाद

नालासोपाऱ्यात गर्दुल्यांच्या टोळीचाही उच्छाद वाढला आहे. दोन दिवसापूर्वी रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणाला अडवून या गर्दुल्याच्या टोळीने लाथा बुक्क्यांनी आणि हातात पडेल त्याने बेदम मारहाण केली. नालासोपारा पूर्व 90 फिट रोडवर विरार मोहक सिटी ते नालासोपारा रोडवर ही घटना घडली. ही मारहाण का केली याबाबत अद्याप कळू शकले नाही. हा मारहाणीचा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  (Man beaten for unknown reason by goons in Nalasopara, incident captured on mobile camera)

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें