महिला IPS अधिकाऱ्याच्या मागे लागला, कारने एक महिना सुरु होता पाठलाग, काय कारण?
मागच्या एक महिन्यापासून कारने महिला आयपीएस अधिकाऱ्याचा पाठलाग सुरु होता. पोलिसांनी त्या संशयित कार चालकाला पकडलं व पोलीस ठाण्यात घेऊन आले. पकडलेल्या संशयिताने चौकशीत सांगितलं की....
महिला IPS अधिकाऱ्याच्या पाठलागाच एक प्रकरण समोर आलय. मागच्या एक महिन्यापासून कारने महिला आयपीएस अधिकाऱ्याचा पाठलाग सुरु होता. सतत एक कार आपल्या पाठिमागे असते, हा संशय आल्यानंतर महिला अधिकाऱ्याने आरोपीला ताब्यात घेतलं. सध्या या आरोपीची चौकशी सुरु आहे. खाण माफियाशी संबंधित हे प्रकरण आहे. आरोपी एका महिन्यापासून ट्रेनी लेडी IPS अधिकारी अनु बेनीवाल यांचं मोबाइल लोकेशन ट्रेस करत होता. आरोपी महिला अधिकाऱ्याच लोकेशन खाण माफियापर्यंत पोहोचवायचा. मध्य प्रदेशच्या ग्वालियर जिल्ह्यातील हे प्रकरण आहे.
भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी अनु बेनीवाल यांची बिजौली पोलीस ठाणे प्रभारी म्हणून ट्रेनिंग सुरु आहे. या भागात बेकायद रेती उपशाच काम सुरु होतं. अनु बेनीवाल मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे रुटीन चेकिंगवर निघाल्या होत्या. बाहेर निघाल्यानंतर त्यांना एक सफेद रंगाची कार दिसली. हीच कार अनेक दिवसांपासून त्यांना आस-पास दिसत होती. त्यांनी ड्युटीवर असलेल्या व्यक्तीला कार चालकाला बोलवण्यासाठी पाठवलं. त्या कार चालकाने पोलिसाशीच हुज्जत घातली.
आमिर खानने चौकशीत काय सांगितलं?
त्यानंतर पोलिसांनी त्या संशयित कार चालकाला पकडलं व पोलीस ठाण्यात घेऊन आले. पकडलेल्या संशयिताने चौकशीत सांगितलं की, “त्याच नाव आमिर खान आहे. खाण माफियाने त्याच्या बेकायद कामात अडथळा ठरणाऱ्या IPS अधिकारी अनु बेनीवाल यांचं लोकेशन ट्रेस करुन ग्रुपमध्ये शेअर करण्याच काम त्याच्यावर सोपवलं होतं” या कामाचे त्याला पैसे मिळत होते. आरोपी ज्या कारने पाठलाग करायचा, ती कार जप्त करण्यात आली आहे. आरोपीची चौकशी सुरु आहे.
लोकेशन जाणून घेण्याच्या मागे का लागलेले?
ट्रेनी आयपीएस अधिकारी अनु बेनीवाल यांची पोस्टिंग बिजौली भागात झाल्यानंतर त्यांनी खाण माफिया विरोधात कारवाईची मोहिम उघडली होती. त्यामुळेच जिल्ह्यातील खाण माफियांमध्ये भीतीच वातावरण आहे. ते IPS अधिकाऱ्याच लोकेशन जाणून घेण्याच्या मागे लागले होते. कारण बेकायद खाण कामावर छापा मारण्याआधी अधिकाऱ्याच लोकेशन समजलं तर ते कारवाईपासून स्वत:ला वाचवू शकतात.