
एका तरुणाचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. कुटुंबीयांनी पोलिसांना सुसाईड नोट दिली असून ती तरुणाने लिहिली असल्याचे स्पष्ट झाले. सुसाईड नोटमध्ये तरुणाने आपल्या मृत्यूसाठी पत्नी, सासू, वहिनी आणि मेहुण्याला जबाबदार ठरवले आहे. पत्नीचे तिच्या मामासोबत प्रेमसंबंध असल्याचे तरुणाने सांगितले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
उत्तर प्रदेशातील इटावामधील चौबिया भागातील उनवा संतोषपूर गावात आमित नावाचा तरुण राहात होता. बुधवारी संध्याकाळी राहत्या घरात त्याने गळफास लावून आत्महत्या केली. मृतदेह पाहून कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. कुटुंबीयांनी पोलिसांना सुसाईड नोट दिली आहे. या नोटमध्ये अमितने काही गोष्टी लिहिल्या होत्या. यामध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी पत्नी आणि इतर सासरच्या मंडळींना जबाबदार धरले आहे.
वाचा: पोलीस अधिकारी पीडित महिलेच्या प्रेमात, खोलित घेऊन गेला… सर्व मर्यादा ओलांडल्या, आता लग्नासाठी…
पोलिस चौकशीत वडील रामवीर सिंह यांनी सांगितले की, अमितचे लग्न दीड वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात झाले होते. दोघांना चार महिन्यांचा मुलगाही आहे. लग्नानंतर मुलगा आणि सून यांच्यात भांडण होत असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी सूनही तिच्या माहेरी गेली होती. पोलिस अधिकारी विपिन कुमार मलिक यांनी सांगितले की, बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. तीन तासांनंतर रात्री 10.30 च्या सुमारास कुटुंबीयांना याबाबत कळाले. पोलीस आल्यावर कुटुंबीयांनी सुसाईड नोट दिली. अमितने त्यामध्ये काही गोष्टी लिहिल्याचे सांगितले जात आहे. सुसाईड नोट तपासासाठी फॉरेन्सिक टीमला देण्यात आली आहे. कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही.
काय आहे पत्रात ?
मी, रामवीर सिंह यादव यांचा मुलगा अमित कुमार यादव, कोणत्याही दबावाशिवाय हे शेवटचे पत्र लिहित आहे. माझ्या मृत्यूला माझी सासू, माझी मेहूणी, माझा मेहुणा आणि माझी पत्नी जबाबदार आहेत. माझी मेहूणी कोणत्या तरी मुलाशी बोलायची आणि माझ्या पत्नीला त्याबद्दल सर्व काही माहित आहे. मी माझ्या मेहुणीचा फोन घेतला आणि माझ्या पत्नीशी याबद्दल बोललो तेव्हा तिने मला सांगितले, “काही झाले तर मी तुझे नाव सांगेन. माझा मेहुणा मला धमकी देत होता की तो मला गोळ्या घालेल. या संभाषणाच्या सर्व रेकॉर्डिंग माझ्या फोनमध्ये आहेत. माझ्या मोबाईलचा पासवर्ड 7896 आहे आणि सर्व रेकॉर्डिंग त्यात सेव्ह आहेत. मी या जगातला सर्वात दुर्दैवी बाप आहे, ज्याला आपल्या मुलांसाठी काही करता आले नाही. माझी पत्नी माझ्याशी सतत भांडायाची. तेव्हा माझी सासू, मेहुणी आणि मेव्हणा तिला आणखी भडकवायचे. मी पोलीस अधिकारी चौबिया यांना विनंती करतो की, माझी सासू, मेहुणी, मेहूणा आणि पत्नीला सोडू नका. त्यांना चांगली शिक्षा द्या.
माझ्या पत्नीचे नांदपूर येथे राहणाऱ्या तिच्या मामासोबत संबंध होते. त्याचे फोनही मला आले. यावर मी आक्षेप घेतल्यानंतर तिने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आई, बाबा, भाऊ, वहिनी, पुतणे, बहीण, पुतणे, मी गेल्यानंतर तुम्ही रडू नका. तुम्ही लोक रडलात तर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही.