AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नी, मोठ्या मुलीला संपवून निवांत झोपला, सकाळी छोट्या मुलीच्याही जीवावर उठला; नृशंस मारेकऱ्याला अखेर अटक

पत्नी आणि मोठ्या मुलीची हत्या केल्यावर तो रात्री निवांत झोपला. सकाळी उठल्यावर लहान मुलीसोबत इकडे तिकडे फिरला आणि रविवारी त्याने तिचाही जीव घेतला. हत्येनंतर तो फरार झाला. घरातून प्रचंड दुर्गंध येऊ लागल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवले. . घटनास्थळ गाठून पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला असता, पण आतील दृश्य पाहून सगळेच हबकले.

पत्नी, मोठ्या मुलीला संपवून निवांत झोपला, सकाळी छोट्या मुलीच्याही जीवावर उठला; नृशंस मारेकऱ्याला अखेर अटक
Image Credit source: social media
| Updated on: Nov 20, 2023 | 3:05 PM
Share

जयपूर | 20 नोव्हेंबर 2023 :  राजस्थानच्या जयपूरमधून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. तेथील करधनी ठाणे क्षेत्रात पत्नी आणि दोन निष्पाप मुलींच्या हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित यादवने (वय 40) शुक्रवारी रात्री पत्नी किरण (वय 33) आणि मोठी मुलगी (वय 11) हिची झोपताना हत्या केली.

दोघींचाही जागीच मृत्यू झाला. आरोपीने अतिशयन नीट प्लानिंग करून ही हत्या घडवून आणली. त्या घरातून दुर्गंध येऊ लागल्यावर या धक्कादायक घटनेचा खुलासा झाला, असं पोलिस म्हणाले. या तिहेरी हत्याकांडामुळ जयपूर हादरलं आहे.

हत्येनंतर लहान लेकीशेजारी झोपला नराधम आरोपी

हत्येच्या घटनेनंतर आरोपी अमित हा त्याच्या दुसऱ्या, लहान मुलीसोबत (वय 6) दुसऱ्या खोलीत जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी तो तिला घेऊन आसपासच्या भागात भटकत राहिला आणि रविवारी तिचीदेखीस हत्या करून तो फरार झाल्याचे, पोलिसांनी सांगितलं.

दुर्गंध पसरल्यावर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं

रविवारी यादव याच्या घरातून प्रचंड दुर्गंध येऊ लागला, त्यामुळे शेजाऱ्यांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळ गाठून पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला असता, आतील दृश्य पाहून सगळेच हबकले. तिथे यादवची पत्नी आणि मोठ्या मुलीचे मृतदेह सापडले. पोस्टमॉर्टमसाठी त्यांचे मृतदेह कांवटिया रुग्णालयात पाठवण्यात आल्यानंतर पोलिसांनी मृत महिलेच्या कुटुंबियांना या घटनेसंदर्भात कळवलं. त्यानंतर आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. त्याच्या मोबाईल फोनचे लोकेशन शोधून त्या आधारे आरोपी अमित याला अटक करण्यात आली असून पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत.

आरोपी आहे उत्तर प्रदेशचा निवासी

आरोपी अमित हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून तो एका फॅक्टरीत काम करतो. मात्र त्याने या तिन्ही हत्या नेमक्या का केल्या, त्यामागचा उद्देश काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी कळवल्यानंतर मृत महिलेचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात येतील. मात्र महिला तिच्या दोन निष्पाप मुलींच्या या तिहेरी हत्येमुळे शहर हादरलं असून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.

राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.