AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विडी देण्यास नकार दिला, संतापलेल्या इसमाने दुकानदार महिलेला थेट…

तो दुकानात आला आणि विडी मागू लागला. पण दुकान बंद करण्याची वेळ झाल्याने दुकानदार महिलेने विडी देण्यास नकार दिला. यामुळे त्याला संताप अनावर झाला.

विडी देण्यास नकार दिला, संतापलेल्या इसमाने दुकानदार महिलेला थेट...
विडी देण्यास नकार दिला म्हणून महिलेला संपवले
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: May 17, 2023 | 11:57 PM
Share

नैनिताल : उत्तराखंडमधील नैनितालमध्ये किरकोळ कारणावरून महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना उजेडात आली आहे. दुकान चालवणाऱ्या महिलेकडे विडी मागितली होती. मात्र तिने विडी देण्यास नकार दिल्यामुळे संतापलेल्या आरोपीने त्याचा बदला घेतला. संतापाच्या भरात त्याने महिलेला ठार केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी मागील दहा दिवस कसून शोधमोहीम सुरु ठेवली होती. अखेर बुधवारी रात्री आरोपीला बरेली येथील घरातून अटक केली. नंदा देवी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

हत्येची घटना 4 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. पोलिसांनी खबरींच्या मदतीने आरोपीची ओळख पटवण्यात यश मिळवले आहे. आरोपी नैनितालमध्ये माती उत्खननाचे काम करायचा. महिलेची हत्या केल्यानंतर तो फरार झाला होता. हत्याकांडाचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला बुधवारीच न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. मनोज पुरी असे आरोपीचे नाव आहे.

संशयाच्या आधारे पोलिसांनी पुरीला ताब्यात घेऊन चौकशी केली

नैनितालचे एसएसपी पंकज भट्ट यांनी कारवाईची माहिती दिली. पुरी हा घटना घडल्याच्या दिवसापासून बेपत्ता असल्याचे पोलिसांना समजले होते. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला होता. त्या अनुषंगाने तपासाची चक्रे फिरवत अखेर बरेलीतील गोरापाडव येथून पुरीला ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशीदरम्यान हत्याकांडातील त्याचा सहभाग उघडकीस आला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

विडी देण्यास नकार दिल्याने हत्या

मृत नंदा देवी ही किराणा दुकान चालवायची. घटनेच्या रात्री पुरी तिच्या दुकानात विडी घेण्यासाठी गेला होता, मात्र दुकान बंद होण्याची वेळ आल्याचे सांगून नंदा देवी हिने पुरीला विडी न देताच माघारी पाठवले. त्यामुळे संतापलेल्या पुरीने नंदा देवीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. काही वेळाने नंदा ही आपल्या घरातील बाथरूममध्ये जाण्यासाठी उठली. त्याचवेळी पुरीने तिच्या डोक्यावर हातोड्याने वार केले. त्यात नंदा देवीचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर आरोपी पुरीने नंदा देवीच्या घरातून मोबाईल फोन, रोख रक्कम आणि इतर साहित्य चोरून पळ काढला होता. पोलिसांनी तो चोरीचा मालही हस्तगत केला आहे. आरोपी पुरीने महिलेचे कपडे आणि मोबाईल आदी ऐवज विकला होता. महिलेचा जावई रोहित मेहरा हा घरी आला होता, त्यावेळी महिलेच्या हत्येची घटना उघडकीस आली होती. सासूला मृतावस्थेत पाहून जावई रोहितने पोलिसांना खबर दिली होती.

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...