टिटवाळ्यात विकृतीचा कळस, पोटच्या लेकीवर बापाचा 6 वर्ष अत्याचार

पत्नी आणि मुलीला जीवे मारण्याच्या धमक्या देत, आरोपीने आपल्या विकृतीला वाट मोकळी करून दिली. एका समाजसेविकेच्या मदतीने हा प्रकार उघडकीस आला असून कल्याण ग्रामीण टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकत अटक केली.

टिटवाळ्यात विकृतीचा कळस, पोटच्या लेकीवर बापाचा 6 वर्ष अत्याचार
क्राईम न्यूज
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 10, 2025 | 3:52 PM

पुण्यातील स्वारगेट बस स्टँड परिसरात तरूणीवरील अत्याचार असो की बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे एका पोलीस अधिकाऱ्याने महिलेवर केलेला अत्याचार, राज्यातील महिलांवरील अत्याचार भयानक वाढले असून वाचूनच अंगावर काटा येतो. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टिटवाळ्यामध्ये देखील असाच भयानक प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. तेथे तर बाप-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका पित्याने आपल्या पोटच्या मुरलीधर तब्बल सहा वर्षे अमानुष अत्याचार केले. मुलगी अवघी 16 वर्षांची असताना या छळाला सुरुवात झाली. पत्नी आणि मुलीला जीवे मारण्याच्या धमक्या देत आणि मारहाण करत तो आपल्या विकृतीला वाट मोकळी करून देत होता.

अखेर एका समाजसेविकेच्या मदतीने हा प्रकार उघडकीस आला. आरोपी हा रेल्वेतील उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत असल्याची पोलिसांची माहिती असून सध्या पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

तब्बल 6 वर्ष सुरू होता अत्याचार 

टिटवाळ्यातील या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आपल्याच पोटच्या मुलीवर 6 वर्षे अत्याचार करणाऱ्या या नराधम पित्याच्या कृत्याने समाज हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अवघी 16 वर्षांची होती, तेव्हाच या अमानुष छळाला सुरुवात झाली. आरोपी हा त्याच्या पत्नी आणि मुलीला जीवे मारण्याच्या धमक्या देत होता आणि त्यांना मारहाणही करत होता, ज्यामुळे पीडितेला या छळाविरुद्ध आवाज उठवणे कठीण झाले.

अखेर, एका सामाजिक संस्थेत काम करणाऱ्या समाजसेविकेपर्यंत या अत्याचाराची माहिती पोहोचली. तिच्या मदतीने हा संपूर्ण प्रकार बाहेर आला. आरोपी हा रेल्वेतील उच्च पदस्थ अधिकारी असल्याचे समजते. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या प्रकारानंतर संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी होत आहे. बापाच्या रूपातच जेव्हा नराधम घरात असतो, तेव्हा अशा मुलींची सुटका कोण करणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिली.