दुसऱ्या पुरूषाशी बोलली म्हणून त्याने गर्लफ्रेंडवर केले चाकूने वार, तरूणी गंभीर जखमी

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या पुरूषाशी बोलली म्हणून त्याने गर्लफ्रेंडवर केले चाकूने वार, तरूणी गंभीर जखमी
पोलीस कॉन्स्टेबल प्रियकराकडून प्रेयसीवर गोळीबार
| Updated on: May 09, 2023 | 11:23 AM

मुंबई : दुसऱ्या इसमाशी बोलत होती म्हणून एका तरूणाने त्याच्या गर्लफ्रेंडवर चाकूने वार (man stabbed girlfriend)केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात ती 31 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. कलिना (kalina) येथे हा दुर्दैवी प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वाकोला पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे कलिना येथील एअर इंडिया रोडवर ही घटना घडली.

पीडित महिला ही एक इव्हेंट मॅनेजर आहे. तिने तिच्या मैत्रिणींसोबत पार्टी केली होती आणि पार्टी संपल्यावर ती रस्त्याच्या कडेला उभी राहून मैत्रिणींशी गप्पा मारत होती. त्याचवेळी आरोपी तिथे आला आणि तिच्यावर अत्याचार करू लागला, असे पोलिसांनी. त्या दोघांमध्ये वादावादी झाल्यनंतर आरोपीने किचेनला जोडलेला एक छोटा चाकू बाहेर काढला आणि त्या महिलेला भोसकण्यासाठी पुढे आली. तेवढ्या तिच्या काही मैत्रिणींनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्यावरही हल्ला चढवला, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

आरोपीने पीडितेच्या मित्र-मैत्रिणींना चाकूचा धाक दाखवून हल्ला केला व त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तो ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील रहिवासी असल्याचे समजते.