AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भयानक ! पत्नीसमोरच त्याने दुसऱ्या महिलेवर केला अत्याचार आणि…

कर्नाटकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विवाहीत महिलेने तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला. आरोपीने त्याच्या पत्नीसमोरच महिलेवर अत्याचार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यत आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

भयानक ! पत्नीसमोरच त्याने दुसऱ्या महिलेवर केला अत्याचार आणि...
| Updated on: Apr 22, 2024 | 10:04 AM
Share

कर्नाटकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विवाहीत महिलेने तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला. तसेच तिचे खासगी फोटो दाखवत, ब्लॅकमेल करत तिच्यावर धर्मांतरणासाठी दबाव आणण्यात आला असा आरोपही पीडित महिलेने केला आहे. याप्रकरणी तिने पोलिसांत धाव घेत 7 जणांविरोधात एफआयआर दाखल केली. आरोपीने त्याच्या पत्नीसमोरच आपल्यावर अत्याचार केल्याचे त्या महिलेने म्हटल्याचेही पोलिसांनी नमूद केले. कपाळाला कुंकू लावू नकोस, बुरखा घाल अशी सक्तीही तिच्यावर करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे. याप्रकरणी 7 लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,रफिक असे आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि त्याच्या बायकोने मला ब्लॅकमेल केले, आणि त्यानंतर रफिकने पत्नीसमोरच माझ्यावर अत्याचार केला. एवढंच नव्हे तर त्यांनी माझे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो काढले आणि ते दाखवून, ब्लॅकमेल करत इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी माझ्यावर दबाव आणला असा आरोप पीडितेने केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रफिक आणि त्याच्या पत्नीने 2023 साली पीडित महिलेला बेळगावमधील त्यांच्या घरात शिफ्ट होण्यास भाग पाडले. आम्ही जे सांगू तेच ऐकावे लागेल, करावे लागेल, अशी सक्तीही त्यांनी तिच्यावर केली. ते तिघेही एकत्र रहात असताना रफीने त्याच्या पत्नीसमोरच आपल्यावर अत्याचर केला, असा आरोप पीडितेने केला. एवढंच नव्हे तर त्या दांपत्याने महिलेला कपाळावर कुंकू लावण्यास मनाई केली. तसेच बुरखा घालण्याची आणि दिवसातून पाच वेळा नमाज पठण करण्यासही भाग पाडले, असा आरोप पीडितेने केल्याची माहिती बेळगावचे एसपी गुलेदा यांनी दिली.

तुझ्या पतीला घटस्फोट दे असेही आरोपीने तिला सांगितले. आणि तसे न केल्यास तुझे इंटिमेट फोटो लीक करेन अशी धमकीही त्याने दिली, असे पीडितेने तिच्या तक्रारीत नमूद केले. धर्मांतरण केले नाही तर जीव घेऊ, अशी धमकीही आरोपींनी पीडितेला दिली. याप्रकरणी पोलिसांनी सौंदत्ती येथे एससी/एसटी कायद्यासह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Follow Us
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...