AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुझा भाऊ घाणेरडा आहे, तो माझ्याकडे… पतीच्या पायाशी चिठ्ठी ठेवून तिने थेट..

"माझी आई हे जग सोडून गेल्यापासून मी तुम्हाला माझे आई आणि वडील मानत आहे. तूही माझ्यावर खूप प्रेम करतोस. पण तुझा भाऊ अंकुश खूप घाणेरडा आहे.. असं नोटमध्ये लिहीलं होतं. नेमकं घडलं तरी काय ?

तुझा भाऊ घाणेरडा आहे, तो माझ्याकडे... पतीच्या पायाशी चिठ्ठी ठेवून तिने थेट..
तुझा भाऊ घाणेरडा आहे, तो.. नोट लिहून महिलेने उचललं टोकाचं पाऊल
| Updated on: Apr 29, 2025 | 9:36 AM
Share

दीर आणि वहिनी यांच्यातील नातं खेळीमेळीचं असतं, कधी ते मित्रांसारखे असतात, तर कधी आई आणि मुलासारखे असते. तर कधी मोठी बहीण आणि धाकट्या भावासारखे वागतात. पण काही लोक या नात्यांचा आदर करत नाहीत. मध्य प्रदेशातील मौगंजमधून असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे, दीराच्या कृतीमुळे त्रासलेल्या वहिनीने टोकाचं पाऊल उचलत आयुष्यच संपवलं. मात्र मरण्यापूर्वी तिने तिच्या पतीच्या पायाजवळ एक मेसेज सोडला. यामध्ये दीराच्या दुष्कृत्यांबद्दल लिहून ठेवला होता.

हे प्रकरण नायगढी पोलिस स्टेशन परिसरातील वॉर्ड-8 मधील आहे. येथे एका विवाहित महिलेने पतीच्या पायावर सुसाईड नोट लिहून ठेवली आणि आत्महत्या केली. मंजू साकेत असं मृ महिलेचं नाव असून ती 27 वर्षांची होती. घरातल्या खोलीत फासावर लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. घटनेच्या वेळी, कुटुंबातील इतर सदस्य गोठ्यात पीक मळणी करत होते. तिचा दीर आणि भाची घरी परतले तेव्हा मृतदेह फासावर लटकलेला पाहून त्यांना धक्का बसला.

या घटनेबद्दल पोलिसांना लगेच कळवण्यात आले. पंचनामा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवला. पोलिसांनी सांगितले की, मृत महिलेच्या पायाजवळ एक सुसाईड नोट लिहिलेली आढळली. त्यात मंजूने तिचा दीर अंकुशवर गंभीर आरोप केले आहेत. दीर माझ्याकडे वाईट नजरेने पाहतो, मी त्याला विरोध केला तर तो मला धमकी देतो, असा आरोप मृत महिलेने केला.

‘अंकुशला सोडू नका ’

मृत महिलेने तिच्या पतीच्या नावाने ही सुसाईड नोट लिहिली होती. “माझी आई हे जग सोडून गेल्यापासून मी तुम्हाला माझे आई आणि वडील मानत आहे. तूही माझ्यावर खूप प्रेम करतोस. पण तुझा भाऊ अंकुश खूप घाणेरडा आहे. तो घाणेरड्या नजरेने माझ्याकडे पाहतो. मी त्याला असं करण्यापासून रोखलं तेव्हा तो भांडायचा. मी खूप वेळा विचार केला की तुम्हाला सगळं सांगावं, पण मी तुमच्यासमोर काहीच सांगू शकले नाही. मला भीती वाटत होती की तुम्ही काहीतरी कराल. मी तर हे जग सोडून जात आहे पण अंकुशला सोडू नकोस. तो गलिच्छ आहे. ” अशा शब्दांत मृत महिलेने तिच्या दीरावर गंभीर आरोप केले.

भावाने लावले गंभीर आरोप

मृत महिला मंजूच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणाही आढळून आल्या. त्यानंतर तिचा भाऊ गोविंद याने अनेक आरोप केलेत. माझ्या बहिणीची हत्या करून तिला फाशी देण्यात आली. त्याने महिलेची सासू, सासरे आणि मेहुण्यांवर गंभीर आरोप केले आहेत आणि निष्पक्ष चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे. हे प्रकरण संशयास्पद असल्याने पोलिसांनी त्याचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे. मृत महिलेच्या पतीचीही चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, पत्नीच्या मृत्यूनंतर पतीला धक्का बसला आहे. सतत रडण्यामुळे त्याची तब्येत गंभीर झाली आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत