ग्राहकांना उधारी का देतो म्हणत मेडिकल दुकानदाराला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Nov 30, 2022 | 7:51 PM

कल्याणमधील बापगावात एकाच ठिकाणी रॉयल मेडिकल आणि मेट्रो मेडिकल आहेत. यापैकी रॉयल मेडिकल चालक ग्राहकांना औषध खरेदीवर आकर्षक सूट देतात. तसेच येणाऱ्या ग्राहकांना उधारी देखील देतात.

ग्राहकांना उधारी का देतो म्हणत मेडिकल दुकानदाराला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
क्षुल्लक कारणातून मेडिकल मालकाला मारहाण
Image Credit source: Tv9
Follow us on

कल्याण : ग्राहकांना उधारी देण्यावरुन दोन मेडिकल दुकानदाराला मारहाण झाल्याची घटना कल्याण जवळील बापगावात घडली आहे. मारहाणीची सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लालाराम सिरवी असे मारहाण झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. मारहाणीत सिरवी यांना दुखापत झाली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ग्राहकांना सूट आणि उधारी दिल्याच्या कारणातून मारहाण

कल्याणमधील बापगावात एकाच ठिकाणी रॉयल मेडिकल आणि मेट्रो मेडिकल आहेत. यापैकी रॉयल मेडिकल चालक ग्राहकांना औषध खरेदीवर आकर्षक सूट देतात. तसेच येणाऱ्या ग्राहकांना उधारी देखील देतात.

याच कारणामुळे संतप्त झालेल्या मेट्रो मेडिकल दुकानदारांनी थेट रॉयल मेडिकल दुकानात घुसून लालाराम सिरवी याला मारहाण केली. या मारहाणीत सिरवी यांना दुखापत झाली.

हे सुद्धा वाचा

दुकानात घुसून मेडिकल चालकाला मारहाण

मेट्रो मेडिकल दुकान मालक दरवेळी आमच्याकडे येऊन लायसन्स आहे का याची विचारपूस करत असतात. तसेच रविवारी 27 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास दुकानात घुसून आम्हाला मारहाण केली असल्याचे लालाराम सिरवी यांच्याकडून सांगण्यात आले. यासंबंधी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली असल्याचे सांगण्यात आले.

पुण्यात किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे दोन गटात किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची घटना घडली. यात दुसऱ्या गटाचा समजून तिरस्त व्यक्तीला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गोपाळ लुकडर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोपाळ आणि त्याचा मामा घटनास्थळावरुन गाडीवरून जात होते.

यावेळी वाद झालेल्या एका गटातील तरूणांची ही गाडी समजून यात गोपाळला दुसऱ्या गटातील तरूणांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. यात गोपाळचा उपचारादरम्यान पुण्यातील ससून रूग्णालयात मृत्यू झाला. शिक्रापूर पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. यातील 3 आरोपी हे अल्पवयीन आहेत.