AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्पवयीन विवाहिता सहा महिन्यांची गर्भवती, माहेर-सासरच्या लोकांविरोधात गुन्हे

याप्रकरणी मुलीच्या पतीसह माहेर व सासरच्या लोकांविरोधात लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन विवाहिता सहा महिन्यांची गर्भवती, माहेर-सासरच्या लोकांविरोधात गुन्हे
विवाहिता सहा महिन्यांची गर्भवती Image Credit source: tv 9
| Updated on: Oct 10, 2022 | 5:45 PM
Share

तेजस मोहतुरे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, भंडारा : बालविवाहासह अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यासाठी शासकीय व सामाजिक पातळीवर विशेष प्रयत्न होत असतात. तरीही अजून हा प्रकार थांबलेला नाही. यांची प्रचिती भंडारा (Bhandara) जिल्ह्यात आली. एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आला. इतकेच नव्हे तर ती 6 महिन्यांची गर्भवतीसुद्धा (pregnant) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लाखनी पोलिसात (Lakhni Police) माहेर व सासरच्या लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी ही मुलगी 18 वर्षापेक्षा कमी वयाची असल्याचे ग्रामसेवकाच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत पोलीस तक्रार केली.

याप्रकरणी मुलीच्या पतीसह माहेर व सासरच्या लोकांविरोधात लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लग्नाच्या वेळी मुलीचे वय 17 वर्षे 3 महिने 5 दिवस होते. असे असताना आई वडिलांनी तिचा विवाह सडक अर्जुनी ( जि. गोंदिया) येथील युवकासोबत लावून दिला. अल्पवयीन मुलीचा विवाह फेब्रुवारी 2022 रोजी लावून देण्यात आला.

मुलगी सज्ञान नाही, ही बाब माहेर आणि सासरकडील लोकांना माहीत होती. तरीही त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले. लग्नानंतर ही मुलगी 6 महिन्यांची गर्भवतीसुद्धा आहे.

ग्रामसेवक नेपाल दशरथ गोटेफोडे यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कलम 376(2) (एन) 376 (2) (जे)34 भा.द.वि. सह कलम 4, 6, बाललैंगिक अत्याचार अधिनियम, बालविवाह प्रतिबंधक अधिनियमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला.

मुलीचे आई व वडील तसेच पती हितेश राजेश वासनिक (24) व सासू, सासरे यांच्यासह इतर नातेवाइकांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लाखनी पोलीस करीत आहेत.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....