Mira Road Murder : मनोज साने आणि सरस्वती वैद्य यांचा विवाह झाल्याचा बहिणींचा दावा

56 वर्षीय मनोज साने याने 32 वर्षीय सरस्वती वैद्य हीची अत्यंत क्रुरपणे हत्या करुन पुरावे नष्ट केल्याच्या प्रकरणाला शुक्रवारी एक वेगळे वळण आले आहे.

Mira Road Murder : मनोज साने आणि सरस्वती वैद्य यांचा विवाह झाल्याचा बहिणींचा दावा
Mira Road Murder Case
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jun 09, 2023 | 7:25 PM

मुंबई : मीरा रोडच्या हत्याकांडाने ( Crime In Mira Road ) क्रुरतेची कळस गाठल्याने देशभर त्याची चर्चा सुरु आहे. आता या हत्याकांडात वेगळीच माहीती पुढे आली आहे. आरोपी मनोज साने आणि पीडित सरस्वती वैद्य हे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ( Leave In Relationship ) मध्ये नव्हे तर या दोघांनी लग्न ( Marriage ) केले होते असा दावा सरस्वतीच्या बहिणींना पोलीसांकडे केला आहे. सरस्वती हीच्या बहिणींचा जबाब आता आरोपीला कोर्टात शिक्षा करताना महत्वाचा ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.

मीरा रोडच्या 56 वर्षीय मनोज साने याने आपल्या 32 वर्षीय पार्टनर सरस्वती हीचा निर्घुण हत्या करीत तिच्या देहाचे तुकडे करुन ते कूकरमध्ये शिजविल्याचा आरोप आहे. या हत्याकांडाने वसईच्या श्रद्धा वालकर हत्याकांडाचा स्मृती जागृत झाल्या आहेत. आतापर्यंत सरस्वती अनाथ असल्याची माहिती पुढे आली होती. परंतू तिच्या तिघी बहिणीनी पोलीसात धाव घेतली आहे. त्यांनी पोलीसांना सांगितले की मनोज साने याने सरस्वती हीच्याशी विवाह केला होता. या दोघांनी नेमका कधी विवाह केला होता याची तारीख समजलेली नाही. त्यांनी मंदिरात लग्न केले होते. मनोज साने आणि तिच्या वयात जास्त अंतर असल्याने दोघांनी लग्नाला कोणाला बोलावले नसल्याचे तिच्या बहिणींनी सांगितल्याचे पोलीसांनी सांगितले.

डीएनए नमूने मॅच करणार

सरस्वती हीच्या शरीराच्या अवशेषाचे डीएनएचे नमूने घेण्यात आले असून तिच्या बहिणीच्या डीएएनशी ते जुळतात का हे तपासले जाणार असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. दरम्यान, सरस्वतीच्या तिघी बहिणींनी तिच्या मृत्यूच्या धक्क्याने रडून रडून पोलीस ठाण्यात गोंधळ घातला आहे. त्यांनी सरस्वतीच्या मृतदेहाचे अवशेष अंत्यसंस्कारासाठी मागितले आहेत. परंतू पोलीसांनी डीएनए नमून्यांची चाचणी झाल्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावरच ते नातेवाइकांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे म्हटले आहे.