सोनमपेक्षाही भयंकर कट! आई-मुलीचा होता एकच बॉयफ्रेंड, लग्नाच्या 30 दिवसांनंतर…
एक भयानक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात आई आणि मुलीचा एकच बॉयफ्रेंड होता. पण जेव्हा सत्य समोर आले तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली.

18 मे 2025 हा दिवस 32 वर्षीय तेजेश्वरसाठी खूप आनंदाचा होता. त्याने पसंत केलेल्या ऐश्वर्याशी त्याचे लग्न होणार होते. कुटुंबाला ऐश्वर्या आवडत नव्हती, पण तेजेश्वरच्या प्रेमाखातर त्यांनी लग्नाला होकार दिला. कारण होते ऐश्वर्याचे आधीपासूनचा एका मुलासोबत प्रेमसंबंध. थाटामाटात वरात निघाली आणि तेजेश्वर ऐश्वर्याला आपली वधू बनवून घरी घेऊन आला. वेळ निघून गेला, वाटलं की पती-पत्नीच्या आयुष्यात सर्व काही ठीक चाललं आहे. पण लग्नाच्या ठीक 30 दिवसांनंतर, 18 जून रोजी तेजेश्वरचा मृतदेह एका गाडीत रक्ताने माखलेल्या अवस्थेत सापडला.
ही गुन्ह्याची कहाणी आहे तेलंगानातील तेजेश्वरची, ज्याचा मृतदेह आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे सापडला. तेजेश्वरकडे जमिनीच्या सर्व्हेचा परवाना होता. ज्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला, त्याच्या एक दिवस आधी तो जमिनीच्या सर्व्हेसाठी गेला होता. संध्याकाळपर्यंत तेजेश्वर परत न आल्याने कुटुंबाने दुसऱ्या दिवशी त्याच्या गायब झाल्याची तक्रार दाखल केली आणि त्याच दिवशी त्याचा मृतदेह गाडीत सापडला.
आता प्रश्न होता की, तेजेश्वरची हत्या कोणी आणि का केली? आपल्या घरापासून दूर त्या ठिकाणी तो काय करत होता, जिथे त्याचा मृतदेह सापडला? तेजेश्वरचे कोणाशीही वैर नव्हतं. पण, पोलिसांना त्याच्या कुटुंबीयांनी जी कहाणी सांगितली, त्यानंतर तेजेश्वरची पत्नी ऐश्वर्या आणि सासू सुजाता यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी तपास केला, तेव्हा समजलं की तेजेश्वरची पत्नी आणि सासू यांनीच त्याच्या हत्येचा कट रचला होता, ज्यात त्यांचा बॉयफ्रेंडही सामील होता.
खरं तर, लग्नापूर्वी तेजेश्वरने आपल्या कुटुंबाला ऐश्वर्याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी आपल्या होणाऱ्या सूनेबद्दल चौकशी केली. या चौकशीत समजलं की, ऐश्वर्याचे एका बँक मॅनेजरशी प्रेमसंबंध आहेत. त्यांनी आपल्या मुलाला याबाबत सावध केलं आणि लग्नाला विरोध केला, पण ऐश्वर्याच्या प्रेमात आंधळा झालेल्या तेजेश्वरने त्यांचं ऐकलं नाही.
लग्नापूर्वी ऐश्वर्या गायब
18 मे रोजी जेव्हा तेजेश्वरचं लग्न होणार होतं, तेव्हा ठीक पाच दिवस आधी ऐश्वर्या घरातून गायब झाली. नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली. दरम्यान, तेजेश्वरच्या कुटुंबाला समजलं की, ऐश्वर्या तिच्या बॉयफ्रेंडसोबत आहे. तीन दिवसांनंतर ऐश्वर्या परत आली आणि म्हणाली की, ती लग्नात दिल्या जाणाऱ्या हुंड्याबाबत चिंतेत होती, म्हणून ती तिच्या मैत्रिणीकडे गेली होती. तिने तेजेश्वरलाही आपली खोटी कहाणी सांगून विश्वासात घेतलं. कुटुंबाने विरोध केला, पण तेजेश्वर ऐश्वर्याशीच लग्न करण्याच्या हट्टावर ठाम राहिला.
सुपारी किलर आणि कट
दोघांचं लग्न झालं आणि काही दिवसांनंतरच ऐश्वर्याच्या वागणुकीत बदल झाला होता. ती अनेकदा लपून मोबाइलवर कोणाशी तरी बोलत होती. तेजेश्वरला वाटलं की, कदाचित वेळेनुसार ती बदलेल, पण कहाणी काही औरच होती. जेव्हा तेजेश्वरला ऐश्वर्याबाबत संशय आला, तेव्हा तिने आपली आई सुजाता आणि बॉयफ्रेंड यांच्यासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला. हत्येसाठी सुपारी किलरही हायर करण्यात आले.
कॉल डिटेल्समधून समोर आलं सत्य
17 जून रोजी तेजेश्वरला एक फोन आला आणि त्याला जमिनीच्या सर्व्हेसाठी बोलावलं गेलं. जेव्हा तेजेश्वर तिथे पोहोचला, तेव्हा संधी साधून सुपारी किलरने त्याची हत्या केली. कुटुंबाच्या आरोपानंतर पोलिसांनी ऐश्वर्याच्या फोनचे कॉल डिटेल्स तपासले, तेव्हा समजलं की, ती लग्नानंतरही आपल्या बॉयफ्रेंडशी सातत्याने बोलत होती. पोलिसांनी कठोरपणे तपास केला तेव्हा ऐश्वर्या फुटली आणि तिने संपूर्ण कहाणी सांगितली.
आई-मुलीचा एकाच व्यक्तीशी प्रेमसंबंध
तिने सांगितलं की, या कटात तिची आईही सामील होती. खरं तर, आरोपी बँक मॅनेजरशी आधी ऐश्वर्याची आई सुजाताचा प्रेमसंबंध होता. नंतर ऐश्वर्याही त्याच्या जवळ आली आणि दोघांमध्ये अवैध संबंध सुरू झाले. नंतर तिने प्रॉपर्टीसाठी तेजेश्वरला आपल्या जाळ्यात अडकवलं आणि त्याच्याशी लग्न केलं. तिचा उद्देश होता, तेजेश्वरला मारून त्याची प्रॉपर्टी हस्तगत करायची आणि नंतर आपल्या बॉयफ्रेंडसोबत सुखाने जगायचं. ऐश्वर्या आणि सुजाता आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. बँक मॅनेजर आणि सुपारी किलर्सचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या पथकं कार्यरत आहेत.
