मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी, ‘त्या’ प्रकरणाचा थेट दिल्लीच्या तिहार जेलशी संबंध ?

सुरक्षा यंत्रणांच्या रडारमध्ये चार ते पाच कैदी आहेत. त्या सर्वांची आता चौकशी केली जाणार आहे (Mumbai Antilia scorpio bomb case connection with Tihar jail).

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी, 'त्या' प्रकरणाचा थेट दिल्लीच्या तिहार जेलशी संबंध ?

मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. या गाडीत जलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या घटनेप्रकरणी गेल्या 15 दिवसांपासून सुरक्षा यंत्रणांचा तपास सुरु आहे. या प्रकरणात दररोज वेगवगळ्या गोष्टी समोर येत आहेत. आजदेखील अशाच प्रकारचा खुलासा झाला आहे. या सर्व प्रकरणाचा संबंध थेट दिल्लीच्या तिहार जेलशी असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागताना दिसत आहे (Mumbai Antilia scorpio bomb case connection with Tihar jail).

चार ते पाच कैद्यांची चौकशी होणार

या घटनेप्रकरणी जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेने एका टेलिग्राम चॅनलवरुन धमकी दिली होती. संबंधित टेलिग्राम चॅनल हे तिहार जेलमधून तयार करण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. सुरक्षा एजन्सीजने नंबर ट्रॅक केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. याबाबतचा तपास करण्यासाठी स्पेशल सेलची टीम तिहार जेलला रवाना झाली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या रडारमध्ये चार ते पाच कैदी आहेत. त्या सर्वांची आता चौकशी केली जाणार आहे.

स्कॉर्पिओ मालकाचा संशयित मृत्यू

दरम्यान, या सर्व घडामोडी सुरु असताना ज्या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या त्या कारचा मालक मन्सूख हिरेन यांचा अचानक ठाण्याच्या खाडीत मृतदेह आढळला. सुरुवातीला मन्सूख हिरेन गायब होते. त्यानंतर संशयितरित्या त्यांचा मृतदेह आढळला. या प्रकरणात हिरेन यांच्या पत्नीने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव घेतल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटलं होतं. याशिवाय त्यांनी सचिन वाझे यांना निलंबित करुन अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणावरुन महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रचंड गदारोळ बघायला मिळालं.

विरोधकांकडून सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी

विरोधी पक्षाकडून सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी केली जात होती. त्यामुळे विरोधी पक्षाच्या वाढत्या दबावामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांची बदली करण्याची घोषणा केली.

एटीएसकडून चौकशी

दरम्यान, एटीएसच्या ठाणे यूनिटमध्ये काल (10 मार्च) मनसुख हिरेन यांच्या पत्नी आणि मुलाने जबाब नोंदवला. त्यांची जवळपास पाच तास चौकशी झाली. याशिवाय एटीएसने याप्रकरणी सचिन वाझे यांचा देखील जबाब नोंदवला (Mumbai Antilia scorpio bomb case connection with Tihar jail).

संबंधित बातम्या :

सचिन वाझेंना क्राईम ब्रॅचमधून हटवलं, ठाकरे सरकार पुन्हा बॅकफूटवर

VIDEO: देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं विधान; पत्नीच्या संशयानुसार मनसुख हिरेन यांची सचिन वाझेंकडून हत्या

मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी एसआयटीद्वारे करणार, गृहमंत्र्यांची घोषणा

Published On - 7:21 pm, Thu, 11 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI