AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai crime : धक्कादायक ! अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करत पैसे देऊन तोंड केले बंद, ‘त्या’ नराधमाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नराधम आरोपीने पीडित मुलीवर अनेकवेळा अत्याचार करत तिचे तोंड बंद ठेवण्यासाठी तिला पैसे दिले, असे पोलिसांनी सांगितले. ही घटना उघडकीस एकच खळबळ माजली असून शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Mumbai crime : धक्कादायक ! अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करत पैसे देऊन तोंड केले बंद,  'त्या' नराधमाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
| Updated on: Sep 14, 2023 | 10:48 AM
Share

मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : शहरातील वाढत्या गुन्ह्यांच्या घटना (crime news) या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलिस कठोर पावले उचलत असले तरीही गुन्ह्यांच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईतील एका शाळेत घडल्याचे उघडकीस आले असून तेथे एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर (minor girl) अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. शाळेत स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनेच हे दुष्कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्याने वारंवार तिच्यावर अत्याचार तर केलाच, पण त्याने तिला १० रुपयांची नोट दिली आणि या कृत्याबाबत कोणासमोरही तोंड उघडू नये, अशी धमकीही तिला दिल्याचे समजते.

काय झालं त्या शाळेत ?

वसई येथील एका शाळेत एक प्रकार घडला असून पीडित मुलगी ही चौथ्या इयत्तेत शिकत आहे. ती तिच्या आई-वडिलांसोबत राहते. या घटनेची माहिती परिसरातील रहिवाशांना समजताच त्यांनी शाळेतील त्या नराधमाला पकडून बेदम मारहाण केली. अखेर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बुधवारी आरोपीला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा ५७ वर्षांचा असून तो शाळेत स्वयंपाकी म्हणून काम करतो. मंगळवारी दुपारी १२ ते ५ च्या दरम्यान शाळेनाच्या वेळेतच ही घटना घडली. पीडित मुलगी वॉशरूमला जात असतानाच आरोपीने तिचा पाठलाग केला. तिला खाद्यपदार्थांचे आश्वासन देऊन तो तिला किचनमध्ये घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर अनेकवेळेस लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर तिला १० रुपयांची नोट देऊन, घडलेल्या प्रकाराबाबत कोणालाही सांगू नकोस असे सांगत धमकीही दिली.

असा उघडकीस आला गुन्हा

शाळा सुटल्यावर पीडित मुलगी घरी आली आणि तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत असल्याची तक्रार आईकडे केली. तेवढ्यात तिच्या आईला, मुलीच्या ड्रेसमध्ये १० रुपयांची नोट सापडली. तुझ्याकडे हे पैसे कुठून आले अशी आईने विचारणा केली असता त्या मुलीने तिच्यासोबत जे घडले ते सांगितले. शाळेच्या स्वयंपाकघरात काम करणाऱ्या एका काकांनी हे पैसे आपल्याला दिले आणि कोणालाही काही सांगू नकोस अशी धमकीही दिल्याचे पीडित मुलीने आईला सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले.

हे सर्व ऐकताच त्या मुलीच्या आईच्या पायाखालची जमीनच हादरली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने तातडीने वळीव पोलिस ठाण्यात धाव घेतल, पोलिसांसमोर सर्व प्रकार कथन करत एफआयआर दाखल केली. तसेच शाळेच्या मॅनेजमेंटमधील अधिकाऱ्यांनाही या घटनेची माहिती दिली. पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिचे समुपदेशन करण्यात आले असता, त्या नराधमाने यापूर्वीही अनेकदा तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

आरोपीला बुधवारी अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. ‘ आपण गेल्या चार वर्षांपासून शाळेत काम करत असल्याचा दावा त्याने केला . परंतु शाळेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आणि रेकॉर्डवरून असे दिसून येते की तो तेथे केवळ एक वर्षापासून काम करत होता. त्याचा पूर्वीचा काहीगुन्हेगारी रेकॉर्ड आहे का ते आम्ही तपासत आहोत, ‘ असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.