विकृती ! रुममध्ये कुणी नाही बघून अवघ्या 15 महिन्याच्या चिमुकलीला अमानुषपणे मारहाण, संतापजनक घटना कॅमेऱ्यात कैद

मीरा रोडमध्ये एका 15 महिन्याच्या चिमुकलीला तिच्याच काकीने अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

विकृती ! रुममध्ये कुणी नाही बघून अवघ्या 15 महिन्याच्या चिमुकलीला अमानुषपणे मारहाण, संतापजनक घटना कॅमेऱ्यात कैद
विकृती ! रुममध्ये कुणी नाही बघून अवघ्या 15 महिन्याच्या चिमुकलीला अमानुषपणे मारहाण, संतापजनक घटना कॅमेऱ्यात कैद

ठाणे : मीरा रोडमध्ये एका 15 महिन्याच्या चिमुकलीला तिच्याच काकीने अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. पीडित चिमुकलीच्या आईने या प्रकरणाचा व्हिडीओ बनवत क्रूर काकीचा खरा चेहरा जगासमोर आणला. या प्रकरणी आरोपी काकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित घटना ही मीरा रोडच्या नयानगर परिसरात घडलीय. 15 महिन्याच्या लहान मुलीला क्रूरपणे मारहाण करणाऱ्या क्रूर काकीचं नाव रेश्मा मोहम्मद फिरोज शेख (वय 32) असं आहे. तिच्या विरोधात बाल न्याय अधिनियम कायद्याअंतर्गत नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

काकीची पुतणीला नाका-तोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण

नयानगरमध्ये एका इमारतीत शेख कुटुंब राहतं. या कुटुंबात पीडित 15 महिन्याच्या मुलीची आई आसमा शेख त्यांचे सासरे, पती, दिर, जाऊ असे एकत्रित कुटुंबात राहतात. आसमा या लहान मुलीला बेड किंवा घरातील हॉलमध्ये सोडून बाथरुम किंवा टॉयलेटला गेल्यानंतर त्यांच्या जाऊ म्हणजेच चिमुकलीची काकू चिमुरड्या मुलीला तिच्या डोक्यात आणि पाठीवर बदाबदा मारुन तिच्या नाका-तोंडातून रक्त येईपर्यंत व डोके सुझेपर्यंत मारहाण करायची. सुरुवातीला मुलीला नेमकं कोण मारतं ते कळत नव्हतं. अखेर आपली जाऊच (काकी) मुलीला मारहाण करत असल्याची आईला खात्री झाली. पण त्याचा पुरावा आईकडे नव्हता.

अखेर क्रूर काकी विरोधात गुन्हा दाखल

चिमुकलीच्या आईने एक युक्ती केली. तिने 14 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास बेडरुममध्ये पलंगावर चिमुरडी झोपेलेली असताना रुममध्ये हँगरला अडकविलेल्या पतीच्या पँटच्या खिशात मोबाईलचे व्हिडीओ शूटिंग चालू ठेवून बाथरूमला गेली. यावेळी चिमुकलीची क्रूर काकू रुममध्ये आली. तिने लहान मुलीला दोन्ही हाताने बदाबदा मारलं. तसेच तिला पायाने ढकललं. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. चिमुकलीच्या आईने रीतसर पोलीस ठाण्यात तक्रार देत त्या निर्दयी जाऊच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास नयानगर पोलीस हे करत आहेत.

पहाटे रिक्षातून येऊन पाच दिवसाच्या बाळाला रस्त्यावर सोडले, कल्याणमधील धक्कादायक घटना

दुसरीकडे कल्याणमधूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पहाटे रिक्षातून आलेल्या एका महिलेने कल्याणच्या मलंग रोड रस्त्यावर एका बाळाला सोडल्याची घटना उघडकीस झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला असून पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत. कल्याण मलंग रोडवरील चेतना शाळा परिसरात रस्त्यालगत आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एक महिला सकाळीच रिक्षातून आली आणि तिने चेतना शाळेच्या परिसरात चार ते पाच दिवसांचा नवजात शिशू सोडून दिला आणि ती तिथून निघून गेली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मानपाडा पोलिसांनी या बाळाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, या प्रकारामुळे कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

दारु न दिल्याने शिवीगाळ, वाट अडवत लाथा-बुक्क्यांनी मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा अंत, मध्यरात्रीचा भयानक थरार

VIDEO: माता न तू वैरिणी! पहाटे रिक्षातून येऊन पाच दिवसाच्या बाळाला रस्त्यावर सोडले, सीसीटीव्हीत प्रकार कैद; कल्याणमध्ये खळबळ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI