VIDEO: माता न तू वैरिणी! पहाटे रिक्षातून येऊन पाच दिवसाच्या बाळाला रस्त्यावर सोडले, सीसीटीव्हीत प्रकार कैद; कल्याणमध्ये खळबळ

कल्याणमध्ये एक अत्यंत दुर्देवी आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पहाटे रिक्षातून आलेल्या एका महिलेने कल्याणच्या मलंग रोड रस्त्यावर एका बाळाला सोडल्याची घटना उघडकीस झाली आहे. (5 days baby found near school in kalyan)

VIDEO: माता न तू वैरिणी! पहाटे रिक्षातून येऊन पाच दिवसाच्या बाळाला रस्त्यावर सोडले, सीसीटीव्हीत प्रकार कैद; कल्याणमध्ये खळबळ
baby found


कल्याण: कल्याणमध्ये एक अत्यंत दुर्देवी आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पहाटे रिक्षातून आलेल्या एका महिलेने कल्याणच्या मलंग रोड रस्त्यावर एका बाळाला सोडल्याची घटना उघडकीस झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला असून पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत. (5 days baby found near school in kalyan)

कल्याण मलंग रोडवरील चेतना शाळा परिसरात रस्त्यालगत आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एक महिला सकाळीच रिक्षातून आली आणि तिने चेतना शाळेच्या परिसरात चार ते पाच दिवसांचा नवजात शिशू सोडून दिला आणि ती तिथून निघून गेली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मानपाडा पोलिसांनी या बाळाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, या प्रकारामुळे कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

चिमूरड्याचा विहिरीत पडून मृत्यू

घरासमोर खेळत असलेला 5 वर्षाचा चिमुरडा शेजारच्या विहिरीत पडल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना डोंबिवलीमधील खंबाळपाडा भोईरवाडी येथील सिताई नगरमध्ये घडली आहे. सिद्धार्थ गणेश कानगट्ट असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. सिद्धार्थ दिव्यांग होता. या दुर्घटनमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. काल सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ नेहमीप्रमाणे आपल्या घरासमोर खेळत होता. बऱ्याच वेळाने सिद्धार्थ कोठेही दिसत नसल्याने त्याचा कुटुंबीयांनी त्याचा आजूबाजूला शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. दुपारच्या सुमारास शेजाऱ्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता सिद्धार्थ पाण्यावर तरंगताना आढळला. नागरिकांनी तातडीने त्याला पाण्यातून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. मात्र शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरानी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नोकरीच्या शोधात असताना मृत्यू

डोंबिवलीच्या खंबालपाडा रोडवर एक व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती. या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी नोकरीचं आमिष देवून मृतकाची फसवणूक केली. विशेष म्हणजे आरोपी बेरोजगार तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून लुबाडायचे, अशी माहिती आता पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. आरोपी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना बोलावून घ्यायचे. त्यांच्याकडील वस्तू लुटून पळ काढायचे. त्यांनी अशाच एका निष्पाप व्यक्तीला नोकरीचे आमिष दाखवून बोलावून घेतले. त्याच्याकडील वस्तू लूटण्याच्या प्रयत्नात त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर पीडित व्यक्तीला डोंबिवलीच्या खंबालपाडा रोडवर फेकून दिलं.

मृतक व्यक्तीचं कृष्णमोहन तिवारी असं नाव आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी मोबाईल नंबरच्या आधारावर चार आरोपींचे बिंग फोडले. धक्कादायक म्हणजे मुख्य आरोपी हा 15 सीमकार्ड आणि 4 मोबाईलचा वापर करत होता. पोलिसांनी चौघांना अटक करुन त्यांनी आतापर्यंत किती लोकांना लूटले आहे? याचा तपास सुरु आहे. (5 days baby found near school in kalyan)

 

संबंधित बातम्या:

बेकायदा इमारतीवर कारवाई नको म्हणून केडीएमसी अधिकाऱ्यांनी 25 लाख घेतले, बिल्डराचा आरोप, ACB कडे चौकशीची मागणी

भाजप नगरसेवकावर विनयभंगाचा आरोप, चूक केली असेल तर चौकशी झाली पाहिजे- सोमय्या

सिडकोने गृहनिर्माण प्रकल्प राबविताना मोकळ्या जागा, पार्किंग आदींचे नियोजन करावे, अजित पवारांची सूचना

(5 days baby found near school in kalyan)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI