MBBS Student Death : सदिच्छा साने मर्डर मिस्ट्री, एका सेल्फीने उलगडले हत्येचे रहस्य

मुंबईच्या पालघर परिसरातील मेडिकल स्टुडंट असलेली सदिच्छा साने ही 14 महिन्यापूर्वी मुंबईच्या वांद्रे बँड स्टँड परिसरातून गायब झाली होती. यानंतर वांद्रे पोलिसात मिसिंगची तक्रार देखील देण्यात आली होती.

MBBS Student Death : सदिच्छा साने मर्डर मिस्ट्री, एका सेल्फीने उलगडले हत्येचे रहस्य
एका सेल्फीने उलगडले हत्येचे रहस्यImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 12:27 AM

मुंबई : एक वर्षापूर्वी गायब झालेल्या मेडिकलच्या विद्यार्थिनीच्या हत्येचे गूढ उकलण्यास अखेर पोलिसांना यश आले. एका सेल्फीने या हत्येचे रहस्य उलगडले आहे. सदिच्छा साने हत्या प्रकरणात पोलिसांना एक सीसीटीव्ही मिळाला आहे. ज्यात मिथु सिंगने सदिच्छासोबत रात्री काढलेल्या सेल्फीचा फ्लॅश दिसतोय. रात्री 2 वाजून 24 मिनिटांच्या सुमारास बांद्रा बँडस्टँडजवळ हॉटेल ताजच्या समोर असलेल्या समुद्रकिनारी हा सेल्फी काढला गेला होता. सदिच्छा सानेची हत्या करणाऱ्या आरोपी मिथु सिंगने हा सेल्फी काढला होता, जो याआधीच समोर आलाय. आता हा सेल्फी काढत असताना जो फ्लॅश निर्माण झाला होता, त्याचं सीसीटीव्ही समोर आलंय. सीसीटीव्हीत अवघा एक सेकंद दिसणारा हा फ्लॅश सध्या पोलिसांसाठी महत्वाचा दुवा ठरला.

वांद्रे समुद्रात मृतदेह शोधण्याचं काम सुरुंय

मागच्या काही दिवसांपासून वांद्रे समुद्रात सदिच्छाचा मृतदेहाचे अवशेष शोधण्याचं काम इंडियन नेव्ही आणि पोलिसांकडून सुरू आहे. मात्र कोणतेही धागेदोरे अद्याप हाती लागले नाहीत.

14 महिन्यांपूर्वी झाली होती सदिच्छाची हत्या

मुंबईच्या पालघर परिसरातील मेडिकल स्टुडंट असलेली सदिच्छा साने ही 14 महिन्यापूर्वी मुंबईच्या वांद्रे बँड स्टँड परिसरातून गायब झाली होती. यानंतर वांद्रे पोलिसात मिसिंगची तक्रार देखील देण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

मिथु सिंगकडून हत्येची कबुली

मात्र या घटनेचा मुंबई क्राईम ब्रांच युनिट 9 कडून तपास सुरू झाल्यानंतर या घटनेत एक ट्विस्ट तयार झाला. अधिक तपासादरम्यान संशयित मिथु सिंग याने सदिच्छा साने हिची हत्या केल्याचं कबूल केल्यानंतर मुंबईच्या बँड स्टँड परिसरात क्राईम ब्रँच युनिट 9 आणि भारतीय नौसेना तुकडी कडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं.

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.