Mumbai Crime : प्रेयसीला खूश करण्यासाठी स्कूटी चोरायचा, पण अखेर पोलिसांच्या तावडीत सापडलाच !

हल्ली प्रेमात पडल्यानंतर तरुणाई काय करेल याचा नेम नाही. पण कधी कधी काहीही करण्याच्या नादात तुरुंगवासही भोगावा लागतो. अशीच एक घटना मालाडमध्ये उघडकीस आली आहे.

Mumbai Crime : प्रेयसीला खूश करण्यासाठी स्कूटी चोरायचा, पण अखेर पोलिसांच्या तावडीत सापडलाच !
स्कूटी चोराला बोरिवली पोलिसांकडून अटक
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 26, 2023 | 10:03 AM

मुंबई / 26 ऑगस्ट 2023 : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. प्रेमात पडल्यानंतर माणूस आपल्या प्रिय व्यक्तीसाठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतो. पण हे वाट्टेल ते करण्याच्या नादात कधी कधी नको ते करुन बसतो. अशीच एक घटना मालाडमध्ये उघडकीस आली आहे. प्रेयसीला खूश करण्यासाठी प्रियकर चोर बनला आणि अखेर तुरुंगात गेला. स्कूटी चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अनिल भीमराव निंबाळकर असे अटक आरोपीचे नाव आहे. तो मालवणी येथील रहिवासी असून, मेकॅनिकचे काम करतो. आरोपीकडून चोरी केलेल्या सहा अॅक्टिव्हा जप्त करण्यात आल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

बोरीवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्कूटी चोरीच्या घटना वाढत होत्या. बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरीचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही आणि सूत्रांच्या मदतीने आरोपी मालाड परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बोरिवली पोलिसांनी एक पथक तयार करून आरोपीला मालाड येथून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून 6अक्टिव्हीहा जप्त केल्या. आरोपीवर बोरिवली, दहिसर, चारकोप आणि कस्तुरबा येथे सहा गुन्हे दाखल आहेत.

पेशाने मेकॅनिक असल्याने आरोपी काही मिनिटांत स्कूटी चोरून पळून जायचा. प्रेयसीला खूश करण्यासाठी आरोपी रोज नवीन अ‍ॅक्टिव्हा चोरायचा. प्रेयसीला स्कूटीवरुन फिरवायचा. मग जिथे स्कूटीचे पेट्रोल संपायचे, तिथेच तो स्कूटी सोडून दुसरी स्कूटी चोरून पळून जायचा. अखेर त्याचा हा कारनामा पोलिसांच्या लक्षात आाला आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलीस अधिक तपास करत आहेत.