चुकून कार सुरु झाली; ब्रेक लावण्याऐवजी वेग वाढवला अन्…

राजूने सुरु करताच कार चुकून पुढे जाऊ लागली. यावेळी राजूने ब्रेक लावून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रेकऐवजी चुकून कारचा वेग वाढला आणि कार अनियंत्रित झाली.

चुकून कार सुरु झाली; ब्रेक लावण्याऐवजी वेग वाढवला अन्...
घाटकोपरमध्ये ऑटोरिक्षा, पादचाऱ्यांना कारची धडकImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 6:31 PM

मुंबई : मोबाईल चार्ज (Mobile Charge) करण्यासाठी कार सुरु केली, मात्र ती कार पुढे जाऊन लागली आणि अनियंत्रित (Uncontrol) झाली. अनियंत्रित झाल्याने कारने रिक्षा आणि पादचाऱ्यांना धडक (Hit) दिली. यामध्ये 7 जण जखमी (Injury) झाल्याची घटना बुधवारी दुपारी घाटकोपरमध्ये घडली आहे. एक महिला, तीन पुरुष, एक मूल आणि दोन किशोर अशा सातही जखमींना पोलिसांनी जवळच्या नागरी संचालित राजावाडी रुग्णालयात दाखल केले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

राजेंद्र प्रसाद बिंदवे, सपना संगारे, आदित्य संगारे, वैष्णवी काळे, जयराम यादव, श्रद्धा सुशविरकर, भरत शहा अशी जखमींची नावे आहेत. या अपघात प्रकरणी पंत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?

घाटकोपरमधील पंत नगर परिसरात ओला कॅब उभी होती. कॅबचा चालक संतोष यादव याने कारच्या आत मोबाईल चार्ज करण्यासाठी त्याचा मित्र राजू यादव याला चावी दिली.

हे सुद्धा वाचा

ब्रेक लावण्याऐवजी चुकून वेग वाढला

राजूने सुरु करताच कार चुकून पुढे जाऊ लागली. यावेळी राजूने ब्रेक लावून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रेकऐवजी चुकून कारचा वेग वाढला आणि कार अनियंत्रित झाली. अनियंत्रित कारने तीन रिक्षा आणि पादचाऱ्यांना धडक दिली. या धडकेत सात जण जखमी झाले.

“राजूने फोन चार्ज करण्यासाठी कार सुरू करण्याचा प्रयत्न केला असता ही अपघाताची घटना घडली. कार रिक्षा आणि पादचाऱ्यांना धडक देत 50 मीटर पुढे गेली. त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे,” असे पंत नगरचे वरिष्ठ निरीक्षक एस.रविदत्त सावंत यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.