AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CCTV : एका अपघातातून वाचले, इतक्यात दुसरी गाडी येऊन जोरात धडकली! 5 जण जागीच…

अपघात इतका भीषण होता की चार पैकी तीन वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला! अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती

CCTV : एका अपघातातून वाचले, इतक्यात दुसरी गाडी येऊन जोरात धडकली! 5 जण जागीच...
थरारक अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदImage Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Oct 05, 2022 | 11:17 AM
Share

मुंबई : वांद्रे वरळी सी लिंकवर  बुधवारी पहाटे भीषण अपघात (Bandra worli Sea Link Accident CCTV Video) झाला. सुरुवातीला 2 वाहनांचा अपघात झाला होता. या अपघातामधील जखमींना रुग्णवाहिकेत (Ambulence) शिफ्ट केलं जात होतं. त्याच वेळी एका भरधाव कार सी लिंकवर उभ्या असलेल्या वाहनांच्या रांगेत घुसली. ही जबर इतकी धडक (Mumbai Accident CCTV) होती की कार एका जागेवरुन उडून पुढपर्यंत फेकली गेली. या भीषण अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघाताची थरकाप उडवणारी दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

या अपघातमध्ये एकूण 12 जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पण चार वाहनांच्या झालेल्या या विचित्र अपघातामध्ये एकूण 5 जणांवर काळाने घाला घातलाय. तर जखमींपैकी काही जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

एक मारुती सुझुकीची बलिनो कार, सफेद रंगाची आणखी एक कार, रुग्णवाहिका, ह्युंदाई क्रेटा आणि अन्य एक वाहन या दुर्दैवी घटनेत अपघातग्रस्त झाले. सर्व वाहनांची अपघातानंतर झालेली स्थिती पाहून, हा अपघात किती भयंकर आणि जबर होता, याची कल्पना करता येऊ शकेल.

पाहा व्हिडीओ :

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या अपघाताचा थरारक घटनाक्रम कैद झालाय. 2.53 वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. वांद्रे वरळी सी लिंकवर दोन वाहनांचा आधीच अपघात झाला होता. या अपघातातील जखमींना घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उभी असल्याचं दिसून आलंय. त्या रुग्णवाहिकेमागे अन्य दोन वाहनंही उभी होती. तर पुढे आणखी एक कार होती.

इतक्यात एक कार भरधाव वेगाने येते. वांद्रे वरळी सी लिंकवर अपघातग्रस्त वाहनांच्या लेनमध्येच ही कार थेट घुसते आणि जोरात आदळते. ही धडक इतकी भीषण होती की चारही वाहनं एकमेकांमध्ये घुसली. एका अपघातातून वाचलेल्या रुग्णांना मृत्यूने पुन्हा एकदा गाठल्याची दुर्दैवी घटना दसऱ्याच्या दिवशी पहाटे घडली.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी वांद्रे वरळी सी लिंकच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर तातडीने अपघातातील जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं. पण त्यातील 5 जणांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. पंतप्रधान कार्यालयाकडूनही या भीषण अपघाताबाबत दुःख व्यक्त करण्यात आलंय.

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ