NCB अधिकारी समीर वानखेडेंचे कॉल डिटेल्स तपासा, भाजप नेत्यांचे कॉल दिसतील, नवाब मलिकांची आग्रही मागणी 

इतकंच नाही तर नवाब मलिक यांनी NCB चे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांचे कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी केली आहे. तसंच समीर वानखेडे यांना भाजप नेत्यांनी फोन केल्यामुळे त्यांनी तिघांना सोडून दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला.

NCB अधिकारी समीर वानखेडेंचे कॉल डिटेल्स तपासा, भाजप नेत्यांचे कॉल दिसतील, नवाब मलिकांची आग्रही मागणी 
नवाब मलिक आणि समीर वानखेडे


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई-गोवा क्रूझ पार्टीप्रकरणी हल्लाबोल सुरुच ठेवला आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवर टाकलेली धाड ही बनावट आणि नियोजित होती. फर्जीवाडा करुन, बातम्या पुरवल्या. 1300 लोकांच्या जहाजावर 11 जणांनाच ताब्यात घेण्यात आलं. त्यापैकी तिघांना का सोडण्यात आलं असा सवाल नवाब मलिक यांनी केला.

इतकंच नाही तर नवाब मलिक यांनी NCB चे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांचे कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी केली आहे. तसंच समीर वानखेडे यांना भाजप नेत्यांनी फोन केल्यामुळे त्यांनी तिघांना सोडून दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला.

दिल्लीपासून महाराष्ट्रातील नेत्यांपर्यंत भाजपच्या नेत्यांनी फोन करुन रिषभ सचदेवा, आमीर फर्निचरवाला, प्रतिक गाभा यांना सोडण्याचे आदेश देण्यात आले, असं म्हणत नवाब मलिकांनी तीन नावं घेतली. इतकंच नाही तर त्यांनी युवा मोर्चाचा अध्यक्ष मोहित कुंबोज आता मोहित भारतीय म्हणून नाव आता लावतात. त्यांचे भाजपच्या बड्या नेत्यांसोबत संबंध, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार, मोहित कुंबोज हे त्यांचे मेहुणे रिषभ सचदेवा यांना सोडवण्यासाठी NCB कार्यालयात गेले होते, असंही नवाब मलिक म्हणाले.

नवाब मलिक काय म्हणाले?

युवा मोर्चाचा अध्यक्ष मोहित कुंबोज आता मोहित भारतीय म्हणून नाव आता लावतात. त्यांचे भाजपच्या बड्या नेत्यांसोबत संबंध, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे. मोहित कुंबोज हे त्यांचे मेहुणे रिषभ सचदेवा यांना सोडवण्यासाठी NCB कार्यालयात गेले होते,  त्यांच्यासोबत त्यांचे वडील, त्यांचे काकाही होते.

प्रतीक गाभा आणि आमीर फर्निचरवाला यांची नावं कोर्टात उल्लेख करण्यात आला. या दोघांच्या बोलावण्यावरुन आर्यन खान तिकडे गेले होते. १३०० लोकांच्या जहाजावर रेड टाकली, रात्री १२ तास रेड टाकण्यात आली, त्यापैकी ११ लोकांना ताब्यात घेतलं, या सर्वांना एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं. त्यानंतर तीन जणांना सोडण्यात आलं, ते कुणाच्या आदेशावरुन हे एनसीबीने सांगावं.

दिल्लीपासून महाराष्ट्रातील नेत्यांपर्यंत भाजपच्या नेत्यांनी फोन करुन रिषभ सचदेवा, आमीर फर्निचरवाला, प्रतिक गाभा यांना सोडण्याचे आदेश देण्यात आले. १३०० लोकांपैकी ११ लोकांना पकडण्यात आलं तर तिघांना का सोडलं हे सांगा. समीर वानखेडेंनी याचा खुलासा तात्काळ सोडावं. १३०० पैकी ११ लोकांनाच का पकडलं, ३ जणांना का सोडलं, कोणत्या माहितीवरुन का सोडलं हे सांगावं.

व्हॉट्सअॅप चॅटवरुन पुढे तपास सुरु आहे. तीन लोकांना का आणि कसं सोडलं. छापेमारीचं काम हे पूर्णपणे बनावट आहे. प्लॅन करुन छापा टाकला, प्लॅन करुन बातम्या पुरवल्या, प्लॅन करुनच लोकांना फसवण्यात आलं. ते निर्दोष आहेत की गुन्हेगार आहेत हे न्यायालयात ठरवलं जाईल. पण तिघांना का सोडलं हा आमचा सवाल आहे.

आमची मुंबई पोलिसांकडे मागणी आहे, चौकशी करा, समीर वानखेडेंची कॉल डिटेल घ्या, ज्चा तिघांना सोडण्यात आलं, वडील आणि काका हे एनसीबी ऑफिसमध्ये गेले याबाबत शंका आहे, समीर वानखेडेंसोबत भाजपच्या नेत्यांचं बोलणं झालं आणि त्यानंतर सोडण्यात आलं हे कॉल डिटेलमध्ये समोर येईल.

VIDEO : नवाब मलिक नेमकं काय म्हणाले?

संबंधित बातम्या  

NCB नं ड्रग्ज पार्टीतून तीन लोकांना सोडलं? मलिकांनी तिन नावं फोडली, भाजप कनेक्शनचा गौप्यस्फोट

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI