AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivli Cylinder Blast: पुजेसाठी अगरबत्ती पेटवली आणि गॅस सिलिंडर फुटला! स्फोटाचा आवाजाने डोंबिवली हादरली, एक गंभीर जखमी

Dombivli Cylinder Blast:घरातील गॅस आधीपासून गळती झाली होती. त्यामुळे ज्वलनशील वायू संपूर्ण घरात पसरलेला होता.

Dombivli Cylinder Blast: पुजेसाठी अगरबत्ती पेटवली आणि गॅस सिलिंडर फुटला! स्फोटाचा आवाजाने डोंबिवली हादरली, एक गंभीर जखमी
डोंबिवलीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोटImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jul 17, 2022 | 2:23 PM
Share

सुनील जाधव, डोंबिवली प्रतिनिधी : डोंबिवलीमध्ये (Dombivli Crime News) एका चाळीतील घरात गॅस सिलिंडरचा स्फोट (Gas Cylinder Blast) झाला. या स्फोटामध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती जखमी झाली. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली होती. पहाटेच्या वेळी ही घटना घडल्यानं आजूबाजूला साखर झोपेत असणाऱ्यांना स्फोटाच्या आवाजाने मोठा धक्का बसला. तर संपूर्ण परिसर गॅस सिलिंडरच्या स्फोटाने हादरुन गेला. डोंबिवली पश्चिमेकडील (Dombivli West) उमेश नगर देवीचा पाडा परिसरात राहणारे हनुमंत मोरे आज (17 जुलै) पहाटे 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास कामावर जाण्यासाठी उठले. पहाटेच्या वेळी दिवाबत्ती करताना त्यांनी काडेपेटी/लायटर पेटवलं होतं. त्यावेळी संपूर्ण गॅस लिक झाल्याची त्यांना क्लपनाही नव्हती. देवबत्तीसाठी पेटवलेल्या एका ठिणगीनं सिलिंडरचा स्फोट झाला आणि अख्खं घर पेटलं. स्वयंपाक घरात असलेल्या सिलिंडरच्या स्फोटातील आगीने घरासह हनुमंत मोरे यांनाही भक्ष्य बनवलं.

भीषण आगीत हनुमंत मोरे प्रचंड होरपळले. जवळपास 40% ते भाजले असून त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सिलेंडरच्या टाकीचा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटात घराचे पत्रे तुटून उडाले. तर स्वयंपाक घरातील बहुतांशी सामान जळाले. संपूर्ण परिसर या स्फोटाच्या आवाजाने पहाटे साडे तीन वाजता हादरुन गेला होता. नेमकं काय झालं, हे पाहण्यासाठी आजूबाजूच्या चाळीतील लोकंही घराबाहेर पडली होती.

गॅस गळतीची कल्पनाच नव्हती

दरम्यान या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून मोरे यांच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांचा मुलगा श्रीनिवास मोरे यांनी सांगितले. गॅस सिलेंडरच्या स्फोटात 65 वर्षीय हनुमंत मोरे गंभीररीत्या भाजले गेलेत. डोंबिवली पश्चिमेकडील उमेश नगर परिसरात घडलेल्या या घटनेनं एकच गोंधळ उडाला होता. सध्या जखमी हनुमंत मोरे यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घरातील गॅस आधीपासून गळती झाली होती. त्यामुळे ज्वलनशील वायू संपूर्ण घरात पसरलेला होता. मात्र याची पुसटीशीही कल्पना वयोवृद्ध हनुमंत मोरे यांना नव्हती. सकाळी नेहमीप्रमाणे पुजेच्या कामाला लागले असता त्यांनी दिवाबत्तीसाठी पेटवलेली ठिणगी सिलिंडरच्या स्फोटाला जबाबदारी ठरल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. मोरे हे एकटेच घरात राहत होते, अशीही माहिती समोर आली आहे.

या भीषण स्फोटानंतर लगेचच अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केलंय. दरम्यान, या भीषण स्फोटात आजूबाजूच्या घरांचंही किरकोळ नुकसान झालंय. तर मोरे यांच्या घराची मोठी आर्थिक हानी झाली आहे. यावेळी घटनास्थळी बचावकार्य केलेल्या लीडिंग फायरमन शिवाजी म्हात्रे, आणि राजेश कासवे यांनी या घटनेबाबत माहिती दिलीये.

Follow Us
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य