जेव्हा कुंपणच शेत खातं, नवी गाडी घेतली, ड्रायव्हरकडे एक चावी, त्याने थेट पळवून नेली

मीरा भाईंदर येथील एका व्यक्तीची हुंडाई कार चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती (driver stolen owner car in mira bhayander).

जेव्हा कुंपणच शेत खातं, नवी गाडी घेतली, ड्रायव्हरकडे एक चावी, त्याने थेट पळवून नेली
जेव्हा कुंपणच शेत खातं, नवी गाडी घेतली, ड्रायव्हरकडे एक चावी, त्याने थेट पळवून नेली

ठाणे : मीरा भाईंदर येथील एका व्यक्तीची हुंडाई कार चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर कार मालकाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. त्यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. संबंधित कार मालकाच्या घराच्या खालीच उभी करण्यात आली होती. कार नेहमी तिथेच उभी केली जायची. पण मध्यरात्री वेळ साधून चोरट्यांनी ती गाडी पळवून नेली होती (driver stolen owner car in mira bhayander).

कार मालक आणि कुटुंबियांकडून शोधाशोध

दुसऱ्या दिवशी पहाटे कारच्या मालकाला या घटनेची चाहूल लागली तेव्हा त्यांनी गाडीची प्रचंड शोधाशोध केली. त्यांच्यासह त्यांच्या घरातील इतर सदस्य आणि परिसरातील मित्र-मंडळींनी कार शोधण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी जवळपास संपूर्ण दिवस कार शोधण्यात घालवला. पण कार त्यांना सापडली नाही. दरम्यान, त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पोलिसात त्यांनी कार चोरीला गेल्याची तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली (driver stolen owner car in mira bhayander).

पोलिसांनी कारवाई कशी केली?

संबंधित घटना ही मीरा भाईंदरच्या पूनम सागर परिसरात घडली. पोलिसांनी ज्या ठिकाणाहून कार चोरीला गेली त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांनी परिसरात किती सीसीटीव्ही कॅमेरे आहेत याचा तपास केला. त्यानंतर पोलीस कामालाच लागले. पोलिसांनी आधी सर्व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यामध्ये चोरटे गाडी घेऊन जाताना दिसले. त्याच आधारावर त्यांनी तपासाचे चक्र फिरवले.

पोलिसांनी गाडी मालकाची चौकशी केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीच्या दोन चाव्या होत्या. त्यापैकी एक चावी ही स्वत: गाडी मालकाकडे तर दुसरी त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरकडे होते. पोलिसांनी ड्रायव्हरला चौकशीसाठी बोलावले. यावेळी ड्रायव्हरच्या हालचाली पाहून पोलिसांना त्याच्यावरील संशय बळावला. त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. अखेर या प्रकरणी पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या.

हेही वाचा : लग्नाच्या आमिषाने मित्राच्या बहिणीवर सहा वर्ष बलात्कार, कॉन्स्टेबलला अटक