छोटा राजनची ‘या’ प्रकरणात निर्दोष मुक्तता; सत्र न्यायालयाचा निकाल

| Updated on: Nov 17, 2022 | 9:06 PM

छोटा राजनची निर्दोष मुक्तता झाली असली तरी तो कारागृहातच कैद राहणार आहे. छोटा राजन हा पत्रकार जे. डे. हत्या प्रकरणात दोषी ठरला होता. त्यामुळे त्याची तुरुंगातून सुटका होणार नाही.

छोटा राजनची या प्रकरणात निर्दोष मुक्तता; सत्र न्यायालयाचा निकाल
छोटा राजनची 'या' प्रकरणात निर्दोष मुक्तता
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : अंडरवर्ल्ड जगतातील कुख्यात गँगस्टर छोटा राजनला गुरुवारी सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयाने दुहेरी हत्याकांडाच्या खटल्यातून निर्दोष मुक्त केले. 2009 मध्ये दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील जे. जे. सिग्नलजवळ दुहेरी हत्याकांड घडले होते. या प्रकरणात छोटा राजनसह आणखी तीन आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. या चारही आरोपींविरोधात सबळ पुरावे दाखल करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे हा निकाल सरकारी पक्षासाठी मोठा झटका मानला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात छोटा राजनची निर्दोष मुक्तता झाली असली तरी तो कारागृहातच कैद राहणार आहे. छोटा राजन हा पत्रकार जे. डे. हत्या प्रकरणात दोषी ठरला होता. त्यामुळे त्याची तुरुंगातून सुटका होणार नाही.

आरोपींनी केला होता अंदाधुंद गोळीबार

दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरात अंदाधुंद गोळीबारामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. या दुहेरी हत्याकांडाचा कट गॅंगस्टर छोटा राजनने रचल्याचा आरोप सरकारी पक्षाकडून करण्यात आला होता. मात्र हा आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे सादर केले गेले नाहीत.

हे सुद्धा वाचा

या प्रकरणात सबळ पुरावे नसल्यामुळे दुहेरी हत्याकांडात छोटा राजनचा संबंध असल्याचे सिद्ध होऊ शकत नाही, असे निरीक्षण विशेष सीबीआय न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए एम पाटील यांनी नोंदवले आहे. छोटा राजन सध्या नवी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बंदिस्त आहे.

आरोपी मागील 12 वर्षांपासून तुरुंगात

29 जुलै 2009 रोजी हे दुहेरी हत्याकांड घडले होते. छोटा शकील टोळीतील असिफ दाढी उर्फ छोटे मिया आणि शकील मोडक या दोघांची गोळ्या झाडून हत्या केली गेली होती. त्यानंतर आरोपी 12 वर्षापासून तुरुंगात होते.

यामध्ये छोटा राजनवर हत्याकांडाचा कट रचल्याचा गंभीर आरोप होता, अशी माहिती आरोपींचे वकील अॅड. अक्षता देसाई, अॅड. साक्षी झा यांनी दिली. या प्रकरणात अंडरवर्ल्ड गँगस्टर छोटा राजनसह मोहम्मद अली जान, प्रणय राणे, उमेद हे चौघे आरोपी होते.

या प्रकरणात आरोपींची घटनेच्या दीड वर्षाषांनत ओळख चाचणी करण्यात आली होती. मात्र, ओळख परेडमध्ये अपयश तसेच वापरलेली हत्यार आणि बुलेट्स मॅच न झाल्याने सरकारी पक्ष आरोप सिद्ध करण्यास अपयशी ठरला. त्या आधारे विशेष न्यायालयाने चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.