कुख्यात गुंड छोटा शकीलच्या भावाची बिल्डरला धमकी, अंडरवर्ल्डचा मुंबईत पुन्हा हस्तक्षेप?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 16, 2021 | 11:04 PM

मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात अंडरवर्ल्डने हस्तक्षेप करायला सुरुवात केल्याचं समोर आलं आहे. कुख्यात गुंड छोटा शकीलचा भाऊ अन्वरने मुंबईतल्या ओशिवारा परिसरातल्या एका बिल्डरला धमकावल्याची माहिती समोर आली आहे.

कुख्यात गुंड छोटा शकीलच्या भावाची बिल्डरला धमकी, अंडरवर्ल्डचा मुंबईत पुन्हा हस्तक्षेप?
प्रातिनिधिक फोटो

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात अंडरवर्ल्डने हस्तक्षेप करायला सुरुवात केल्याचं समोर आलं आहे. कुख्यात गुंड छोटा शकीलचा भाऊ अन्वरने मुंबईतल्या ओशिवारा परिसरातल्या एका बिल्डरला धमकावल्याचं समोर आलं आहे. ओशिवरा परिसरातल्या 6 झोपड्यांचा मालक असलेल्या अरबाज शेख याची एक झोपडी पुनर्विकास योजनेसाठी पात्र ठरली. तर उर्वरित पाच झोपड्या या अपात्र ठरल्या. त्या पाचही झोपड्या पात्र ठराव्यात यासाठी त्याने संबंधित बिल्डरकडे तगादा लावला. मात्र या झोपड्या पात्र ठरवण्यासाठी सबंधित विभागाकडे संपर्क करा, असे बिल्डरने सांगूनही तो दबाव टाकत होता.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याच प्रकरणात एका मध्यस्थाच्या मदतीने छोटा शकीलचा भाऊ अन्वरने त्या बिल्डरला धमकवल्याचं समोर आलं आहे. ओशिवारा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक याचा तपास करत आहे. खंडणी विरोधी पथकाने आरोपी अरबाज शेख आणि त्या मध्यस्थाला अटक केली आहे. त्यांना 17 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपींकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

मध्यस्थाने अरबाज शेख याच्यासोबत अनेकदा बैठका घेऊन अन्वरसोबत स्वतःच्या फोनवरुन बोलणं करुन दिलं होतं. शिवाय दोघांनीही या प्रकरणातले बरेचसे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या प्रकरणात अन्वरचा सहभाग स्पष्ट झाला आहे. छोटा शकीलचा भाऊ असलेला अन्वर सध्या परदेशात लपला आहे. त्याच्यावर खंडणी आणि इतर काही गुन्हे आधीपासून दाखल आहेत.

खंडणी विरोधी पथकाचा तपास सुरु

या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात पीआय संजय तरलगट्टी, एपीआय थोरात, एपीआय सुशील वंजारी, पीएसआय लेम्भे यांच्याकडून सुरु आहे.

हेही वाचा :

गाड्यांचे सायलेन्सर चोरायचे, नंतर मातीपासून खरंखुरं सोनं बनवायचे? तपास करताना पोलीसही चक्रावले

खिशातून पिस्तूल काढली, मोबाईल दुकानदारावर रोखली, नंतर गोळीबार, आरोपीने असं का केलं ज्याने पुणे हादरलं?

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI