बुरखा घालून मला कोणी गोळ्या झाडू शकतो, माजी नगरसेवकावर लेडी डॉनची दहशत

| Updated on: Aug 13, 2023 | 4:57 PM

तिच्या साथीदारांनी खून करण्याची धमकी दिली असल्याचा आरोप माजी नगरसेवकाने केला आहे. कार्यालयात येऊन लेडी डॉन तुझा खून करणार असल्याची धमकी दिली, असंही माजी नगरसेवकाचं म्हणण आहे.

बुरखा घालून मला कोणी गोळ्या झाडू शकतो, माजी नगरसेवकावर लेडी डॉनची दहशत
Follow us on

मुंबई : घाटकोपर येथील परिसरात अवैध झोपड्या बांधल्या जात आहेत. याविरोधात माजी नगरसेवकाने आवाज उठवला. तक्रार केल्यानंतर मनपाने अवैध बांधकाम हटवले. त्यामुळे माजी नगरसेवकाला धमक्या येत आहेत. या धमक्या लेडी डॉनच्या माध्यमातून येत आहेत. लेडी डॉनविरोधात तडीपारीची कारवाई झाली. खून, चोऱ्या, दरोडे असे गुन्हे आहेत. अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या जात आहेत. तक्रारीनंतर काही झोपड्या महापालिकेने तोडल्या. झोपड्या तोडायला लावल्या म्हणून तिच्या साथीदारांनी खून करण्याची धमकी दिली असल्याचा आरोप माजी नगरसेवकाने केला आहे. अक्रमने कार्यालयात येऊन लेडी डॉन तुझा खून करणार असल्याची धमकी दिली, असंही माजी नगरसेवकाचं म्हणण आहे.

मुंबईच्या घाटकोपर परिसरात एका माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी घाटकोपरच्या लेडी डॉनवर गुन्हा दाखल करण्यात आला. घाटकोपरचे माजी नगरसेवक आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते परमेश्वर कदम यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. त्याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला.

भूमाफिय सक्रिय असल्याचा आरोप

पोलिसांनी या प्रकरणात शुक्रवारी घाटकोपरची गॉडमदर लेडी डॉन करीमा शेख आणि तिच्या दोन साथीदारांवर दाखल केला. माफियांनी संधी मिळताच वस्त्यांमध्ये अवैध बांधकामे करतात. असं आपल्या तक्रारीत परमेश्वर कदम यांनी उल्लेख केला. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत कदम यांनी म्हटले आहे की, महापालिकेने 4 जुलै रोजी करीमा शेखच्या निर्देशावर बेकायदा बांधकाम तोडले. एवढंच नव्हे तर घाटकोपरमधील कामराजनगर, विक्रोळीतील कन्नमवारनगर आणि नेताजीनगर या झोपडपट्टी भागातील भूमाफिय सक्रिय असल्याचा आरोप आहे.

मला गोळ्या घालू शकतात

आपल्या तक्रारीमध्ये कदम यांनी असं म्हटलं आहे की “खरे काम शेखचा सहकारी अक्रम अन्सारी करत आहे. कधीही बुरखा घालून कोणी माझ्या कार्यालयात येऊ शकतो. मला गोळ्या घालू शकतो. माझे काय झाले हे कोणालाही न कळता निघून जाऊ शकतो, असं कदम यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

तक्रारदाराने दिलेल्या स्टेटमेंट आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे शेख, अन्सारी आणि त्यांचा आणखी एक साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हेगारी कट आणि गुन्हेगारी धमकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

कोण आहे करीमा शेख?

करीमा शेखला पूर्वी करीमा मुजीब शाह म्हणून ओळखले जातं असे. तिच्यावर खून, खंडणी आणि अवैध शस्त्रास्त्र वापराचे अनेक गुन्हे पोलिसांत दाखल आहेत. घाटकोपरची गॉड मदर म्हणून ओळखल्या जाणार्‍या तिला आपा (मोठी बहीण) आणि अगदी मम्मी असे तिच्या टोळीतील अनेक सदस्य म्हणतात. मात्र पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत असून, करीमा शेख फरार आहे.