पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण, संतापलेल्या पत्नीने पतीवर फेकले उकळते तेल
कल्याणमध्ये पती-पत्नीच्या भांडणातील वेगळाच प्रकार समोर आहे. पती आणि पत्नीमध्ये झालेल्या भांडणात संतापलेल्या पत्नीने पतीवर उकळते तेल फेकले. या घटनेत पती जखमी झाला आहे. पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News: पती आणि पत्नी यांचे नाते सात जन्माचे म्हटले जाते. या नात्यांमध्ये अनेक कडू गोड आठवणी येत असतात. दोघांमध्ये कधी कधी नोकझोक होत असते. रुसवा फुगवा होत असतो. परंतु टोकाची भूमिका घेतली जात नाही. याला अपवाद कल्याणमधील घटना आह. पती-पत्नी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात पत्नीला प्रचंड संताप झाला. मग तिने उकळते तेल पतीवर फेकले. त्यात पती गंभीर जखमी झाला आहे. या प्रकारानंतर पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेहरा-डोळ्यास गंभीर इजा
गोवंडी मोहल्ल्यातील उस्मान गेजरे चाळीत राहणारे इम्रान शेख हे रिक्षा चालक आहे. त्यांच्या उत्पन्नावरच कुटुंब अवलंबून आहे. त्यांची पत्नी दिवा शेख ही गृहिणी आहे. बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की, संतप्त दिवाने स्वयंपाकघरात गरम केलेले उकळते तेल थेट इम्रानच्या अंगावर फेकले. या हल्ल्यात इम्रानचा डोळे, चेहरा, हात व शरीराचा बराचसा भाग भाजला. तो जोरात आरडाओरड करू लागला. आवाज ऐकून परिसरातील लोक जागे झाले व मदतीला धावले. इम्रामने त्याच्या मित्रांच्या मदतीने पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि झालेल्या प्रकाराची माहिती दिली.
प्राथमिक उपचार घेतल्यानंतर इम्रानने रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना सादर केला. त्यानुसार पोलिसांनी पत्नी दिवा शेख हिच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १२१(१) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर कुवर करत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांचे मार्गदर्शन सुरू आहे. दरम्यान, आरोपी पत्नी दिवा शेख हिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पॉक्सो कायद्यातील आरोपी फरार
टिटवाळा पोलिसांच्या ताब्यात असलेला पॉक्सो कायद्यातील एक सराईत आरोपी कल्याण न्यायालय परिसरात पोलीसांना चकवा देत थरारकपणे फरार झाला आहे. कल्याण तालुका टिटवाळा पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांच्या हाताला झटका देत पोलिसांच्या निष्काळजीपणाचा फायदा घेत आरोपीने गर्दीचा उपयोग करत पलायन केले. या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चैतन्य राजू शिंदे (वय २१, रा. रोहिदासनगर, रोहा, रायगड) असे आरोपीचे नाव आहे.
