#क्राईम_किस्से : आई-वडील, पत्नी-मुलांसह घरातील 14 जणांची हत्या, तरुणाचा गळफास, ठाण्यातील हत्याकांडातून एकमेव महिला बचावलेली

| Updated on: Aug 27, 2021 | 7:10 AM

ठाण्यातील कासारवडवली परिसरात वडवली गावात राहणाऱ्या वारेकर कुटुंबासाठी 28 फेब्रुवारी 2016 ची मध्यरात्र भयावह ठरली. हसनैनने शीतपेयातून सर्वांना गुंगीचं औषध दिलं. घरातील सर्वांची शुद्ध हरपल्यानंतर रात्री एकामागून एक मोठ्या चाकूने त्याने सगळ्यांचे गळे कापले होते.

#क्राईम_किस्से : आई-वडील, पत्नी-मुलांसह घरातील 14 जणांची हत्या, तरुणाचा गळफास, ठाण्यातील हत्याकांडातून एकमेव महिला बचावलेली
Husnain Warekar
Follow us on

मुंबई : 28 फेब्रुवारी 2016 ची रात्र ठाण्याच्या वारेकर कुटुंबासाठी काळरात्र (2016 Thane stabbing) ठरली. कारण एकाच घरात तब्बल 15 मृतदेहांची रास पडली होती. आई, वडील, पत्नी, पोटची मुलं, बहिणी यांच्यासह कुटुंबातील तब्बल 14 जणांची हत्या करुन ठाण्याच्या 35 वर्षीय हसनैन अन्वर वारेकर (Husnain Warekar) याने आत्महत्या केली होती. 7 लहान मुलं, 6 महिला आणि एका पुरुषाचा याच समावेश होता. रात्री कुटुंबातील सर्वांना बेशुद्ध करुन, प्रत्येकाच गळे चिरुन हसनैनने हे सामूहिक हत्याकांड केलं होतं. त्यानंतर त्याने स्वतःचंही आयुष्य संपवलं.

कर्जाच्या डोंगराखाली दबलेला?

कॉमर्स पदवीधर असलेला हसनैन नवी मुंबईतील सीए फर्ममध्ये आयकर संबंधित कागदपत्रे तयार करण्याचे काम करत होता. त्याने त्याच्या नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. तो जवळपास 67 लाख रुपयांच्या कर्जाच्या डोंगराखाली दबला गेला होता. तो शेअर ट्रेडिंगही करायचा आणि त्यातही त्याला मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं बोललं जायचं. तर वारेकर कुटुंबात मालमत्तेवरुन वाद असल्याचीही त्यावेळी चर्चा होती.

काय घडलं ‘त्या’ रात्री?

ठाण्यातील कासारवडवली परिसरात वडवली गावात राहणाऱ्या वारेकर कुटुंबासाठी 28 फेब्रुवारी 2016 ची मध्यरात्र भयावह ठरली. मात्र त्याआधी या भयंकर घटनेची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. एकाच घरात सर्व बहिणी-भाचे कंपनी जमली होती. हसनैननेच सर्वांना दावत देण्यासाठी बोलावलं होतं. घरात आनंदाचं-हसरं खेळतं वातावरण होतं. हसनैनने शीतपेयातून सर्वांना गुंगीचं औषध दिलं. घरातील सर्वांची शुद्ध हरपल्यानंतर रात्री एकामागून एक मोठ्या चाकूने त्याने सगळ्यांचे गळे कापले होते. आई, वडील, बायको, पोटच्या दोन मुली, ज्यातली धाकटी अवघ्या तीन महिन्यांची होती, तिचाही त्याने गळा चिरला. याशिवाय तीन बहिणी, तीन भाच्या, तीन भाचे यांनाही त्याने संपवलं.

एकमेव बहीण बचावली

या हत्याकांडातून बचावलेल्या एकमेव महिलेने हसनैनबद्दल धक्कादायक माहिती दिली होती. या हत्याकांडातून जिवंत वाचलेली एकमेव व्यक्ती म्हणजे त्याची 22 वर्षांची बहीण सबिया युसूफ भारमल. त्या रात्री भावाने सगळ्यांना सॉफ्टड्रिंकमधून गुंगीचं औषध पाजलं. मात्र सर्दी झाल्यामुळे मी ते प्यायले नव्हते. ही गोष्ट हसनैनला समजली नव्हती. रात्रीच्या वेळी हसनैनने एकामागून एक सगळ्यांचे गळे चिरताना तिने पाहिलं होतं. भाऊ जवळ येताच ती उठली आणि त्याच्याशी वाद घालू लागली. मात्र त्याने तिच्यावरही वार केले. कशीबशी त्याच्या तावडीतून ती निसटली आणि तिने स्वतःला एका खोलीत बंद केलं. पहाटेचे तीन वाजले होते. तिने जोरजोरात आरडाओरड करुन शेजाऱ्यांना जागं करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत हसनैनने इतर सर्वांचे जीव घेतले होते. आणि स्वतःही गळफास घेतला होता.

विवाहबाह्य संबंधांचाही दावा

हसनैनचे कदाचित अन्य महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असावेत, असा अंदाज त्याच्या फेसबुक अकाऊंटवरील काही हार्टब्रेक मेसेजवरुन बांधला गेला होता. उल्लेखनीय म्हणजे, त्याने घराजवळच्या माजिवाडा परिसरात भाड्याने एक खोली घेतली होती आणि त्याच्या कुटुंबातील कोणालाही याबद्दल माहिती नव्हती. त्याच्या घरातून मानसिक आजाराच्या लक्षणांकडे निर्देश करणारी काही औषधेही पोलिसांनी जप्त केली होती.  हल्ल्यातून वाचलेली बहीण सबिया युसूफ भारमलने पोलिसांना सांगितलं होतं, की हसनैन त्याच्या मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या धाकट्या बहिणीवर बलात्कारही करायचा.

कोणाकोणाची हत्या केली होती

अन्वर वरेकर (वडील, 65 वर्ष),
असगरी (आई, 56 वर्ष),
जबिन (पत्नी, 28 वर्ष),
मुबातशिरा (मुलगी, 6 वर्ष),
उमरा (मुलगी, तीन महिने),
शबीना शौकत खान (बहीण 35 वर्ष),
मारिया इरफान फक्की (बहीण 28 वर्ष),
बतुल (बहीण, 30 वर्ष),
अनस शौकत खान (भाची, 12 वर्ष),
सादिया शौकत खान (भाची, 16 वर्ष),
अर्सिया युसूफ भारमल (भाची, पाच महिने),
अलीहासन शौकत खान (भाचा, 5 वर्ष),
उमर इरगन फक्की (भाचा, 7 वर्ष),
युसूफ इरफान खान (भाचा)

संबंधित बातम्या :

Divya Bharti | पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यू, अभिनेत्री दिव्या भारतीचा अखेरचा दिवस कसा होता?

Nafisa Joseph | लग्नाच्या तोंडावर गळफास, मिस इंडिया नफीसा जोसेफच्या आत्महत्येसाठी बॉयफ्रेण्डला ठरवलेले जबाबदार