AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malad Murder : प्रेयसीचे दुसऱ्या पुरुषांशी अनैतिक संबंध, संतापलेल्या प्रियकराने तरुणीचा गळा चिरला

तरुणीच्या डोक्याला दोन गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या. त्यामुळे प्रचंड रक्तस्राव झाला आणि त्यातच तरुणीला प्राण गमवावा लागला.

Malad Murder : प्रेयसीचे दुसऱ्या पुरुषांशी अनैतिक संबंध, संतापलेल्या प्रियकराने तरुणीचा गळा चिरला
मालाडमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची हत्याImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 29, 2022 | 2:41 AM
Share

मुंबई : प्रेयसीच्या दुसऱ्या पुरुषांशी अनैतिक संबंध (Immoral Relation) असल्याचे कळल्यानंतर संतापलेल्या प्रियकरा (Boyfriend)ने तरुणीची गळा चिरुन हत्या (Murder) केल्याची घटना मालाडमध्ये बुधवारी मध्यरात्री घडली. मनिषा पृथ्वीपाल जयस्वार (27) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मयत तरुणीच्या मावसभावाच्या फिर्यादीवरुन कुरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करत 12 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अखिलेश कुमार प्यारेलाल गौतम (24) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रेयसी घरी एकटी असताना अखिलेशने तिचा गळा चिरत डोक्यावर वार करत तिची हत्या केली. अखिलेश आणि मनिषाचे प्रेमसंबंध होते आणि दोघे लग्नही करणार होते. मध्यरात्री मनिषाचा मावस भाऊ घरी आल्यानंतर हत्येची घटना उघडकीस आली.

प्रेयसीच्या डोक्याला गंभीर जखमा; तीव्र रक्तस्रावामुळे मृत्यू

तरुणीच्या डोक्याला दोन गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या. त्यामुळे प्रचंड रक्तस्राव झाला आणि त्यातच तरुणीला प्राण गमवावा लागला. कुरार पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली परंतु कोणताही भक्कम पुरावा हाती लागू शकला नव्हता. त्यानंतर फोन रेकॉर्डचे विश्लेषण केल्यानंतर पोलिसांनी तिचा प्रियकर अखिलेश कुमार गौतम याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी तो गुन्हा नोंद झाल्यापासून बेपत्ता असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांना गुरुवारी मानखुर्द रेल्वे स्थानकावर गौतम सापडला. चौकशीनंतर गौतमनेच तरुणीचा खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्यावर भादंवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला. गौतम हा मनीषासोबत लग्न करण्याच्या तयारीत होता. याचदरम्यान त्याला मनीषा हिचे दुसऱ्याशी संबंध असल्याचे कळले. मनीषाचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तो कांदिवली शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

मानखुर्द रेल्वे स्थानकावर सापळा रचून केली अटक

बेपत्ता अखिलेशला पकडण्यासाठी पोलिसांच्या टीममध्ये चहुबाजुंनी शोध मोहिमेवर रवाना झाल्या होता. त्याच्या लोकेशनच्या आधारे पोलिसांचे पथक मानखुर्द परिसरात पाठलाग करीत गेले होते, तेव्हा तो मानखुर्द रेल्वे स्टेशनवर असल्याचे आढळले. त्याआधारे पोलिसांनी रेल्वे स्थानकावर सापळा रचून अखिलेशला अटक केली. त्याला रेल्वे स्थानकावर अटक करून कुरार गाव पोलीस ठाण्यात आणले असता चौकशीदरम्यान त्याने खुनाची कबुली दिली. हत्येच्या कारणाबाबत पोलिस चौकशीत त्याने मनीषसोबत माझे जुने प्रेम असल्याचे सांगितले. मी मनिषाशी लग्न करणार होतो. पण मला काही लोकांकडून समजले की तिचे परपुरुषांशी अनैतिक संबंध असल्याचे कळले, त्यातूनच हत्या केल्याचे अखिलेशने पोलिसांसमोर कबूल केले. अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश पाटील, पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मोहिते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली कुरार पोलिसांनी या हत्याकांडाचे गूढ 12 तासांत उकलून आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. (In Malad the girlfriend is killed by her lover due to her immoral relations)

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.