मेरठहून मोठ्या तयारीने मुंबईत आला, पण दरोडा टाकण्याआधीच मुंबई पोलिसांनी झडप घातली !

एका गुन्ह्यातून सुटला अन् पुन्हा दुसऱ्या गुन्ह्याची तयारी करत होता. पण पोलिसांना सुगावा लागला अन् गुन्हा घडण्याआधीच पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

मेरठहून मोठ्या तयारीने मुंबईत आला, पण दरोडा टाकण्याआधीच मुंबई पोलिसांनी झडप घातली !
मुंबईत दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 10:29 AM

मुंबई / 24 जुलै 2023 : गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिसांच्या नजरेतून सुटत नाही. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा कांदिवलीत आला आहे. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेशातून मुंबईला आलेल्या चोरट्याच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीकडून बंदूक, कार, जिवंत काडतूस आणि अॅक्टिव्हा ताब्यात घेतली आहे. फरान हनीफ कुरेशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कुरेशी हा उत्तर प्रदेशातील मेरठचा रहिवासी आहे. आरोपीला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार आहे. याआधी कांदिवलीत समता नगर परिसरात गोळीबार करत आरोपीने चोरी केली होती. या गुन्ह्यातून तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.

मुंबईतून मेरठ, मग दिल्ली गाठत पुन्हा मुंबईत आला

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आरोपी मूळ गावी यूपीतील मेरठला गेला. तेथे त्याने देशी कट्टा खरेदी केला. मग तेथून तो दिल्लीला गेला. दिल्लीत त्याने दोन कार चोरल्या. त्यानंतर दरोडा टाकण्याची तयारी करुन मुंबईत आला. मुंबईत आल्यानंतर तो दररोज दोन्ही गाड्यांवर मुंबईतील दुसऱ्या वाहनाची डुप्लिकेट नंबर प्लेट लावून तो दरोड्यासाठी रेकी करत असे.

पोलिसांना सुगावा लागला अन् डाव फसला

या दरम्यान पोलिसांना आरोपीच्या या कटाचा सुगावा लागला. यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. आरोपीने देशी कट्टा, जिवंत काडतूस, दोन कार आणि एक अॅक्टिव्हासह अटक केली. आरोपीने 2020 मध्ये समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार करून आरोपीने दागिन्यांचे दुकान लुटले होते. या गुन्ह्यात दीड वर्ष मुंबईच्या तुरुंगात राहिल्यानंतर आरोपी प्रथम मेरठला गेला आणि पुन्हा दरोडा टाकण्याची तयारी करुन मुंबई आला.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.