AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुरक्षा कंपनीत नोकरीचं आमिष, गणवेशाच्या नावाखाली लुबाडणूक, अशी झाले बबली बंटी जेरबंद

या प्रकरणी पोलिसांनी कविता लाड या महिला आणि अब्दुल हमीद शेख या पुरुषाला अटक केली आहे. सुरक्षा कंपनीचे खाते गोठवण्यात आल्याचे दिंडोशी पोलिसांनी सांगितले.

सुरक्षा कंपनीत नोकरीचं आमिष, गणवेशाच्या नावाखाली लुबाडणूक, अशी झाले बबली बंटी जेरबंद
दिंडोशी पोलीस
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Dec 31, 2022 | 10:23 PM
Share

मुंबई : सुरक्षा पर्यवेक्षक पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून हजारो लोकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या कंपनीच्या मॅनेजर महिला आणि पुरुषाला मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. मालाड रेल्वे स्थानकाजवळ नॅशनल सिक्युरिटीच्या नावाने सिक्युरिटी कंपनीचे बोगस कार्यालय उघडून आरोपी लोकांना गंडा घालायचे. मालाड स्थानकाजवळ नॅशनल सिक्युरिटी कंपनीचे कार्यालय सुरू असल्याची तक्रार एका व्यक्तीने दिंडोशी पोलीस ठाण्यात दिली होती.त्या कंपनीत सुरक्षा पर्यवेक्षक पदासाठी पीडितेने अर्ज केला होता. कंपनीच्या वतीने आरोपी त्याला फॉर्म भरायला लावायचे. गणवेशाच्या नावाखाली अडीच हजार ते तीन हजार रुपये उकळायचे.

पैसे दिल्यानंतर पुढील महिन्यात पीडितेला नोकरीवर रुजू होण्याची तारीख देण्यात आली. सुरक्षा रक्षक आणि पर्यवेक्षक पदावर काम करून देण्याच्या नावाखाली दररोज 40 जणांकडून अडीच हजार रुपये घेतले जात होते.

सुमारे ३ महिने हे बोगस कार्यालय नॅशनल सिक्युरिटीच्या नावाखाली सुरूच होते. तोपर्यंत दीड हजारांहून अधिक लोकांना निवडून देण्यात या लोकांनी यश मिळवले होते. त्यानंतर एक दिवस कार्यालय बंद करून आरोपी गायब झाला.

या प्रकरणी पोलिसांनी कविता लाड या महिला आणि अब्दुल हमीद शेख या पुरुषाला अटक केली आहे. सुरक्षा कंपनीचे खाते गोठवण्यात आल्याचे दिंडोशी पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात हजारो लोकांची फसवणूक झाली आहे.

सुरक्षा रक्षक व पर्यवेक्षकाच्या नावावर भरतीसाठी फसवणूक झालेल्या लोकांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात येऊन आपले म्हणणे नोंदवावे, असं दिंडोशीचे एपीआय अतुल माळी यांनी सांगितलं.

Follow Us
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारण
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारणही आलं समोर
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; PM मोदींचं विकसित भारत संकल्प...
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; याचा रोडमॅप... PM मोदींचं विकसित भारत संकल्पाबाबत मोठं विधान
सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat : सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय काय म्हणाले?
विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, तटकरेंचा जोरदार हल्लाबोल
Sunil Tatkare On Sanjay Raut : विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, सुनील तटकरेंचा जोरदार हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही साधला निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले
Sunil Tatkare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले; म्हणाले....
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या...
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या जावयाची उपाध्यक्षपदी वर्णी
संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी....
Hasan Mushrif : संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी; महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर....
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान....
Latur : District Bank Voting : जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान, बाजी कोण मारणार?
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
MNS On Chhath Puja : गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजेवरून मनसे आक्रमक
महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, राऊतांचा..
Sanjay Raut : महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, संजय राऊतांचा इशारा; भोजपुरी गाण्यांवरून सरकारला सवाल