AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदाराच्या मुलीची लग्नपत्रिका व्हायरल, लोक का सर्च करताहेत अमेरिकेतील हे शहर?

आमदार अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नवरदेवाच्या अमेरिकेतील जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीतील MBA शिक्षणामुळे लोकांना जॉर्जिया आणि अटलांटा शहरांबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे अमेरिकेतील या शहरांबद्दल Google वर मोठ्या प्रमाणात शोध घेतला जात आहे, तसेच लग्नाच्या भव्य तयारीचीही चर्चा सुरू आहे.

आमदाराच्या मुलीची लग्नपत्रिका व्हायरल, लोक का सर्च करताहेत अमेरिकेतील हे शहर?
shivangi singhImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 12, 2026 | 2:21 PM
Share

बिहारच्या मोकामाचे आमदार अनंत सिंह यांची मुलगी शिवांगी सिंह हिचा विवाह सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मीडियापासून सोशल मीडियापर्यंत शिवांगीच्या लग्नाची तुफान चर्चा सुरू आहे. सध्या बिहारमध्ये लग्नाची भव्य तयारी सुरू आहे. या दरम्यानच शिवांगीची लग्नपत्रिकाही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. या लग्नपत्रिकेमुळे केवळ तिच्या लग्नाचीच चर्चा होत नाहीये, तर अमेरिकेतील एक शहर सुद्धा या चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. लग्नपत्रिका व्हायरल झाल्यानंतर लोक गुगलवर अमेरिकेतील जॉर्जिया स्टेट आणि त्याच्याशी संबंधित शहरे शोधत आहेत.

गुगल ट्रेंडसच्या सर्च डेटामध्ये गेल्या काही तासात जॉर्जिया शहरांमध्ये लोकांनी खूपच इंटरेस्ट दाखवल्याचं दिसून आलं आहे. त्याचं कारण म्हणजे लग्नपत्रिकेत देण्यात आलेली एक माहिती आहे. लग्नपत्रिकेत नवरदेव ऋषिकेश कुमारच्या शैक्षणिक पात्रतेचीही माहिती देण्यात आली आहे. ऋषिकेश यांनी अमेरिकेच्या अटलांटा येथील जॉर्जिया स्टेट विद्यापीठातून एमबीए केलं आहे. या माहितीमुळे लोकांची अमेरिकेतील शहरांबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.

जॉर्जिया कुठे आहे?

सोशल मीडियावर लग्नपत्रिकेचा फोटो आल्यानंतर लोक जॉर्जिया कुठे आहे? आणि तिथलं विद्यापीठ कुठे आहे? तिथे कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं? याची माहिती गुगलवर शोधत आहेत. तसेच क्यूएस रँकिंगमध्ये या विद्यापीठाला कितवी रँक मिळालेली आहे, याची माहितीही लोक शोधत आहेत. याशिवाय या शहराला लागून असलेल्या इतर शहरांची माहितीही लोक सर्च करताना दिसत आहेत.

सांस्कृतिक शहर

जॉर्जिया हे अमेरिकेच्या दक्षिण पूर्व येथील एक महत्त्वाचं राज्य आहे. याची राजधानी अटलांटा आहे. जॉर्जिया हे अमेरिकेतील प्रमुख शहरांपैकी हे एक शहर आहे. अटलांटा हे व्यवसाय, परिवहन, शिक्षण आणि संस्कृतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. याच शहरात जॉर्जिया स्टेट यूनिव्हर्सिटी आहे. हे एक सार्वजिनक विद्यापीठ आहे. या ठिकाणी बिझनेससहीत अनेक विषयांचं शिक्षण दिलं जातं.

25 नोव्हेंबरला लग्न

दरम्यान, शिवांगी हिचं लग्न येत्या 25 नोव्हेंबरला होणार आहे. ऋषिकेश बिहार जिल्ह्यातील पटणा येथील बिहटाचे रहिवाशी आहेत. पण ते सध्या अमेरिकेत स्थायिक असून तिथेच नोकरी करतात. लग्नासाठी त्यांचं कुटुंब बिहारमध्ये गावी आलं आहे. या लग्नाची भव्य तयारी सुरू आहे. 10 एकर जागेवर मंडप बांधण्यात येणार आहे. या लग्नाला सुमारे 4 लाख पाहुणे येणार आहेत. या पाहुण्यांसाठी मेजवाणीत 150 प्रकारचे पदार्थ ठेवण्यात आले आहेत. तसेच लग्नाच्या निमित्ताने घोड्यांची शर्यतही आयोजित करण्यात आली असून जिंकणाऱ्या घोड्याला थार आणि बाइक गिफ्ट दिली जाणार आहे. तसेच अनंत सिंह यांनी आपल्या लाडक्या जावयला गिफ्ट म्हणून देण्यासाठी लँड रोव्हर डिफेंडर कार घेतली आहे. तर, मुलासाठी बीएमडब्ल्यू कार घेतली आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारण
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारणही आलं समोर
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; PM मोदींचं विकसित भारत संकल्प...
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; याचा रोडमॅप... PM मोदींचं विकसित भारत संकल्पाबाबत मोठं विधान
सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat : सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय काय म्हणाले?
विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, तटकरेंचा जोरदार हल्लाबोल
Sunil Tatkare On Sanjay Raut : विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, सुनील तटकरेंचा जोरदार हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही साधला निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले
Sunil Tatkare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले; म्हणाले....
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या...
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या जावयाची उपाध्यक्षपदी वर्णी
संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी....
Hasan Mushrif : संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी; महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर....
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान....
Latur : District Bank Voting : जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान, बाजी कोण मारणार?
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
MNS On Chhath Puja : गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजेवरून मनसे आक्रमक
महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, राऊतांचा..
Sanjay Raut : महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, संजय राऊतांचा इशारा; भोजपुरी गाण्यांवरून सरकारला सवाल