AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hanuman Ansh: ‘हनुमान अंश’च्या निर्मात्यांना लागली लॉटरी; एका झटक्यात तब्बल इतक्या कोटींची ओटीटी डील

Hanuman Ansh: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता 'हनुमान अंश' ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चित्रपटगृहात हा चित्रपट पाहण्याची संधी न मिळालेल्या प्रेक्षकांना घरबसल्या त्याचा आनंद घेता येणार आहे.

Hanuman Ansh: 'हनुमान अंश'च्या निर्मात्यांना लागली लॉटरी; एका झटक्यात तब्बल इतक्या कोटींची ओटीटी डील
Hanuman AnshImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 12, 2026 | 2:12 PM
Share

Hanuman Ansh: बॉलिवूडमध्ये सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. कोणताही मोठा सुपरस्टार नाही, कोट्यवधींचं प्रमोशन नाही, तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनपेक्षित यश मिळवलं. हा चित्रपट म्हणजे ‘हनुमान अंश’. नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित असलेल्या या भक्तिप्रधान चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकण्यासोबतच कमाईचेही अनेक विक्रम केले आहेत. आता या चित्रपटाच्या डिजिटल आणि टेलिव्हिजन प्रदर्शनाच्या हक्कांची मोठी डील झाल्याची चर्चा आहे. तब्बल 63 कोटी रुपयांना ही डील झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

काय आहे ‘हनुमान अंश’ची 63 कोटींची डील?

‘हनुमान अंश’ या चित्रपटाचे डिजिटल आणि टीव्ही प्रदर्शनाचे हक्क सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाने विकत घेतले आहेत. या करारानुसार हा चित्रपट 27 नोव्हेंबर 2026 पासून Sony LIV या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. त्यानंतर Sony MAX या टीव्ही चॅनेलवरही त्याचं प्रसारण होणार आहे. मात्र, टीव्ही प्रीमियरची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. या डीलची रक्कम 63 कोटी रुपये असल्याचं वृत्त चर्चेत असलं, तरी या आकड्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. याआधी चित्रपटाच्या ओटीटी हक्कांसाठी 100 कोटी रुपयांची डील झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र, निर्मात्या रागिनी सोना यांनी या वृत्तांचं खंडन केलं होतं.

2 कोटींचं बजेट, जगभरात 452 कोटींची कमाई!

या चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं बजेट आणि बॉक्स ऑफिसवरील कमाई. अवघ्या 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात तब्बल 452.86 कोटी रुपयांचा गल्ला जमवल्याची आकडेवारी समोर आली आहे. सुरुवातीला चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, प्रेक्षकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रिया आणि तोंडी प्रसिद्धीमुळे चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली. कमी बजेटमध्ये एवढं मोठं यश मिळवणारा हा 2026 मधील चर्चेतील चित्रपट ठरला आहे.

नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित कथा

‘हनुमान अंश’ हा चित्रपट संत नीम करोली बाबा यांच्या जीवनप्रवासावर आधारित आहे. चित्रपटात लक्ष्मीनारायण नावाच्या एका लहान मुलाची कथा दाखवण्यात आली आहे. आईच्या निधनानंतर तो देव, जीवन आणि मृत्यू यांचा अर्थ शोधण्यासाठी प्रवासाला निघतो. या आध्यात्मिक प्रवासातून त्याचा नीम करोली बाबा होण्यापर्यंतचा प्रवास उलगडतो. अभिनेता शोभिनव सत्याने मुख्य भूमिका साकारली असून चंदन आनंद यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

Follow Us
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारण
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारणही आलं समोर
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; PM मोदींचं विकसित भारत संकल्प...
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; याचा रोडमॅप... PM मोदींचं विकसित भारत संकल्पाबाबत मोठं विधान
सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat : सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय काय म्हणाले?
विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, तटकरेंचा जोरदार हल्लाबोल
Sunil Tatkare On Sanjay Raut : विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, सुनील तटकरेंचा जोरदार हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही साधला निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले
Sunil Tatkare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले; म्हणाले....
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या...
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या जावयाची उपाध्यक्षपदी वर्णी
संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी....
Hasan Mushrif : संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी; महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर....
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान....
Latur : District Bank Voting : जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान, बाजी कोण मारणार?
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
MNS On Chhath Puja : गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजेवरून मनसे आक्रमक
महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, राऊतांचा..
Sanjay Raut : महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, संजय राऊतांचा इशारा; भोजपुरी गाण्यांवरून सरकारला सवाल