AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur News: सोलापुरच्या कन्येची कमाल! बाल सुरक्षेसाठी तयार केलं अनोख डिवाईस, नेमकी काय आहे अभिनव संकल्पना?

शांभवीने बालसुरक्षेसाठी 'सेफ फ्लाय स्मार्ट आयडी कार्ड' ही अभिनव वैज्ञानिक संकल्पना विकसित केली आहे. या सेफ फ्लाय आयडी कार्डद्वारे लहान मुले हे आपल्या पालकांच्या संपर्कात राहू शकतात.

Solapur News: सोलापुरच्या कन्येची कमाल! बाल सुरक्षेसाठी तयार केलं अनोख डिवाईस, नेमकी काय आहे अभिनव संकल्पना?
| Updated on: Nov 12, 2026 | 2:34 PM
Share

Solapur News:  मनात जिद्द अन् काहीतरी नवी करण्याची इच्छाशक्ती असली की कोणतीच गोष्ट अशक्य नसते हेच सोलापुरमधील एका विद्यार्थिनीने दाखवून दिले आहे. सोलापूरच्या एका विद्यार्थिनीने बाल सुरक्षेसाठी एक अनोखे डिवाईस तयार करत राष्ट्रीय स्तरावरन झेप घेतली आहे. या डिवाईसमुळे विद्यार्थी तसेच लहान मुले आपल्या पालकांच्या संपर्कात राहू शकतात. नेमकी कायआहे ही अभिनव संकल्पना? जाणून घ्या सविस्तर…

सोलापूरच्या विद्यार्थिनीने तयार केलं अनोखे डिवाईस! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अक्कलकोट तालुक्यातील केएलई मंगरुळे हायस्कुलमध्ये शिक्षण घेणाऱ्या शांभवी रामण्णा आजगुंडेच्या एका अभिनव कल्पनेची देशभरात चर्चा होत आहे. शांभवीने बालसुरक्षेसाठी ‘सेफ फ्लाय स्मार्ट आयडी कार्ड’ ही अभिनव वैज्ञानिक संकल्पना विकसित केली आहे. या सेफ फ्लाय आयडी कार्डद्वारे लहान मुले हे आपल्या पालकांच्या संपर्कात राहू शकतात.

शांभवी आजगुंडाने विकसित केलेल्या या फ्लाय स्मार्ट आयडी कार्डमध्ये कॅमेरा, ब्लूटूथ, यासह जीपीएस सिस्टीम कार्यरत आहे त्यामुळे पालक आपल्या मुलांच्या थेट संपर्कात राहू शकतात. या सेफ फ्लाय आयडी कार्डद्वारे लहान मुले हे आपल्या पालकांच्या संपर्कात राहू शकतात. या डिवाईस मध्ये कॅमेरा, ब्लूटूथ, यासह जीपीएस सिस्टीम कार्यरत आहे त्यामुळे पालक आपल्या मुलांच्या थेट संपर्कात राहू शकतात. विशेष म्हणजे या डिवाईस मध्ये इमर्जन्सी, फोटो-व्हिडीओ, व्हाईस रेकॉडिंगची सुविधा आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे मुलांवर संकट आल्यास त्याची माहिती पालकांना मिळण्यासाठी या डिवाईसचा उपयोग होणार आहे.

शांंभवीच्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर दखल! 

शांभवीच्या या प्रकल्पाचे केंद्र सरकारच्या विज्ञान मंत्रालयातील INSPIRE या राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनामध्येही सादरीकरण झाले. त्यानंतर दिल्ली येथील भारत मंडपममध्ये राष्ट्रीय स्तरावर तिने आपल्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. त्यानंतर आता तिला केंद्र सरकारकडून जपानच्या शैक्षणिक दौऱ्याची संधीही मिळाली आहे. शांभवीच्या संशोधनाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली जात असून NASA संदर्भातील निवड प्रक्रियेतही तिचे नाव चर्चेत आले आहे. ग्रामीण भागातून आलेली एक विद्यार्थिनी आपल्या कल्पकतेच्या आणि मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेऊ शकते. तिच्या यशामुळे सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारण
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारणही आलं समोर
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; PM मोदींचं विकसित भारत संकल्प...
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; याचा रोडमॅप... PM मोदींचं विकसित भारत संकल्पाबाबत मोठं विधान
सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat : सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय काय म्हणाले?
विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, तटकरेंचा जोरदार हल्लाबोल
Sunil Tatkare On Sanjay Raut : विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, सुनील तटकरेंचा जोरदार हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही साधला निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले
Sunil Tatkare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले; म्हणाले....
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या...
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या जावयाची उपाध्यक्षपदी वर्णी
संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी....
Hasan Mushrif : संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी; महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर....
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान....
Latur : District Bank Voting : जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान, बाजी कोण मारणार?
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
MNS On Chhath Puja : गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजेवरून मनसे आक्रमक
महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, राऊतांचा..
Sanjay Raut : महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, संजय राऊतांचा इशारा; भोजपुरी गाण्यांवरून सरकारला सवाल