चित्रपटात भूमिका देण्याच्या बहाण्याने मॉडेलवर बलात्कार, मुंबईत सिनेनिर्मात्याला बेड्या

मॉडेल म्हणून काम करणाऱ्या महिलेने आशिष भावसार विरोधात मार्चमध्ये गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे कलम 376 आणि 506 (2) अंतर्गत गोरेगाव पोलिसात एफआयआर नोंदवण्यात आला होता.

चित्रपटात भूमिका देण्याच्या बहाण्याने मॉडेलवर बलात्कार, मुंबईत सिनेनिर्मात्याला बेड्या
मॉडेलवर बलात्कार प्रकरणी सिने निर्मात्याला अटक

मुंबई : मॉडेलवर बलात्कार केल्याप्रकरणी मुंबईत चित्रपट निर्मात्याला अटक करण्यात आली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर मार्च महिन्यात आरोपी आशिष भावसार याच्याविरोधात गोरेगाव पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. याविषयी वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही मॉडेलने केला आहे.

काय आहे प्रकरण?

मॉडेल म्हणून काम करणाऱ्या महिलेने आशिष भावसार विरोधात मार्चमध्ये गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहितेच्या कलम 376 आणि 506 (2) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता. त्याचा अटकपूर्व जामीन रद्द झाल्यानंतर आरोपीला आता अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

पोलिसांनी सांगितले की, पीडितेने तिच्या जबाबात म्हटले आहे की, आरोपीने तिला चित्रपटात भूमिका देण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपीने पीडितेला धमकी दिली की जर तिने कोणाला याविषयी सांगितले, तर तो तिला जीव ठार मारेल. अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

पत्नीवरील बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल, पतीला अटक

दरम्यान, विवाहितेवर बलात्काराचा व्हिडीओ शूट करुन तिला ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी महिलेच्या पतीलाही बेड्या ठोकल्या आहेत. पत्नीचे अश्लील व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला घटस्फोटासाठी ब्लॅकमेल करत पतीनेच ते व्हायरल केल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील देवनार भागात ही घटना घडल्याची धक्कादायक माहिती आहे.

देवनारमध्ये राहणाऱ्या पीडित महिलेने यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी दोघांनाही पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, ब्लॅकमेलरने आधी महिलेवर बलात्कार केला आणि या घटनेचा व्हिडीओ शूट केला. त्यानंतर तिला धमकी दिली, की जर त्याला 5.20 लाख रुपये दिले गेले नाहीत, तर तो हे बलात्काराचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करेल.

नवऱ्याकडूनही ब्लॅकमेल

महिलेने आरोपी ब्लॅकमेलरला पैसे दिले नाहीत, त्यामुळे त्या व्यक्तीने ते व्हिडीओ तिच्या पतीला पाठवले. आपल्या पत्नीला आधार देण्याऐवजी पतीनेही तिलाच ब्लॅकमेल करुन घटस्फोट मागण्यास सुरुवात केली. इतकंच नाही, तर पतीने पत्नीचे व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप आहे.

उत्तर प्रदेशातून पतीला बेड्या

आरोपी पती मुंबईहून उत्तर प्रदेशातील श्रावस्ती येथील त्याच्या घरी पळून गेला होता. पोलिसांनी त्याला तिथून पकडले. त्यानंतर त्या महिलेवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीलाही पकडण्यात आले. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर बलात्कार, खंडणीसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईत विवाहितेवर बलात्कार, व्हिडीओ शूट करुन पतीला पाठवला, पतीने व्हायरल केला

दहावीच्या अभ्यासात मदतीचा बहाणा, नवी मुंबईत 17 वर्षांच्या चुलत भावाकडून बलात्कार, पीडिता गर्भवती

इन्स्टाग्रामवर मैत्री, वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावलं, अल्पवयीन मुलीवर एकाच रात्री तीन ठिकाणी सामूहिक बलात्कार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI