Kalachowky Baby Murder | चारवेळा गर्भपात, सासरचे टोमणे, पोटच्या पोरीला मारणाऱ्या ‘वैरीण माते’ने हत्येची कारणं सांगितली

| Updated on: Dec 04, 2021 | 12:50 PM

मुंबईतील काळाचौकी परिसरातील फेरबंदर भागात संघर्ष सदन इमारतीत मंगळवारी ही घटना घडली होती. भांडी विकणाऱ्या महिलेने आपल्या बाळाचं अपहरण केल्याची खोटी तक्रार 36 वर्षीय सपना मगदूम हिने पोलिसात केली होती.

Kalachowky Baby Murder | चारवेळा गर्भपात, सासरचे टोमणे, पोटच्या पोरीला मारणाऱ्या वैरीण मातेने हत्येची कारणं सांगितली
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

मुंबई : मुंबईतील काळाचौकी परिसरातून तीन महिन्यांच्या मुलीचं अपहरण झाल्याचा बनाव रचणाऱ्या आईचं बिंग नुकतंच फुटलं होतं. मुलगा न झाल्यामुळे सासरच्या मंडळींच्या टोमण्यांना वैतागून तीन महिन्यांच्या मुलीची हत्या (Mumbai Kalachowky Baby Girl Murder) केल्याची कबुली वैरीण मातेने दिली. जन्मदात्रीने पोटच्या पोरीची हत्या करुन तिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत ठेवला होता.

मुंबईतील काळाचौकी परिसरातील फेरबंदर भागात संघर्ष सदन इमारतीत मंगळवारी ही घटना घडली होती. भांडी विकणाऱ्या महिलेने आपल्या बाळाचं अपहरण केल्याची खोटी तक्रार 36 वर्षीय सपना मगदूम हिने पोलिसात केली होती.

काय आहे प्रकरण?

मंगळवार 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 ते 1 वाजताच्या सुमारास 30 ते 35 वर्षाची महिला आली आणि जुन्या मोबाईलच्या बदल्यात नवीन भांडी देण्याचं आमिष तिने दाखवलं. जुना मोबाईल आणण्यासाठी आपण आतल्या खोलीत गेलो, तेव्हा भांडी विक्रेती महिला मागून आली आणि तिने गुंगीचे औषध नाकाला लावून आपल्याला बेशुद्ध केलं. त्यानंतर पलंगावर झोपलेल्या तीन महिन्याच्या बाळाला या महिलेने पळवून नेलं, असा बनाव आरोपी महिलेने केला होता.

महिलेचे बदलते जबाब

महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि संशयित महिलेचं रेखाचित्र तयार करुन घेतलं. ते जारी करत महिलेचा शोधही सुरु झाला. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजही तपासण्यात आले. क्राईम ब्रांच या घटनेचा समांतर तपास करत होती. घटनेचे अधिक तपशील मिळवण्यासाठी त्यांनी तक्रारदार महिला आणि तिच्या पतीला चौकशीसाठी बोलावलं. मात्र महिलेचे सतत बदलणारे जबाब ऐकून क्राईम ब्रांचला संशय येऊ लागला. त्यांनी कसून चौकशी केली असता महिलेने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पाण्याच्या टाकीतून बुडवून बाळाची हत्या केल्याचं तिने सांगितलं. विशेष म्हणजे ती टाकी घरातच होती.

सासरच्या टोमण्यांनी हैराण

आरोपी महिलेचा विवाह 2011 मध्ये झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगी आहे. दुसऱ्यांदा गर्भवती असताना तिच्या गर्भात मुलगी असल्याची कुणकुण कुटुंबीयांना लागली. त्यामुळे त्यांनी महिलेचा गर्भपात केला. अशाच प्रकारे आणखी तीन वेळा तिचा गर्भपात करण्यात आला. ऑगस्ट महिन्यात तिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर सासरच्या कुटुंबीयांनी तिच्याशी सर्व संबंध तोडले. याच रागातून तिने बाळाची हत्या केल्याचा आरोप आहे.

संबंधित बातम्या :

CCTV | कॉलेजबाहेर विद्यार्थ्यावर सपासप वार, नाशकातील हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

दुसऱ्या लग्नाला विरोध करणाऱ्या आजीची मुंबईत हत्या, सात वर्षांनी नातू तिसऱ्या बायकोसोबत सापडला

प्रेयसीची हत्या, दगड बांधून मृतदेह खाडीत टाकला, विरारमधील खुनाचा पाच दिवसात उलगडा