मुलाच्या काळजीमुळे अचानक यूटर्न, दोघांचा बळी घेणाऱ्या अपघातानंतर कार चालकाचा दावा

अमितने यू टर्न घेतला, त्याच वेळी पुलावरुन भरधाव वेगाने येणारी बाईक कारला धडकून अपघात झाला, ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. कार चालक अमित कुमार हा घटनेनंतर फरार झाला होता

मुलाच्या काळजीमुळे अचानक यूटर्न, दोघांचा बळी घेणाऱ्या अपघातानंतर कार चालकाचा दावा
मुंबईच्या लोअर परळ ब्रिजवर कारने अचानक युटर्न घेतल्याने मोठा अपघात
| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 12:52 PM

मुंबई : मुंबईतील लोअर परेल ब्रिजवर अचानक यू टर्न घेतल्याने झालेल्या अपघातात प्रकरणी कार चालकाला अटक करण्यात आली आहे. दोन दुचाकीस्वार तरुणांचा या अपघातात मृत्यू झाला होता. मुलाची तब्येत बिघडल्याचं पत्नीने फोन करुन सांगितल्यानंतर घाबरुन घाईघाईत वळण घेतल्याचा दावा कारचालक अमित कुमार याने केला आहे.

कार चालक अमित कुमारचा दावा काय

अमित कुमार हा अंधेरीतील एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. रात्री मित्राला भेटायला तो लोअर परेल भागातील फिनिक्स मॉलकडे येत होता. त्यावेळी अचानक पत्नीचा फोन आला. आणि मुलाची तब्येत बिघडल्याचं पत्नीने त्याला सांगितलं. त्यामुळे त्याने घाबरुन लगेच पुलावरुनच यू टर्न घेतला आणि घाईघाईत घरी निघाला, असा दावा अमित कुमारने केला आहे.

सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून गाडी शोधली

अमितने यू टर्न घेतला, त्याच वेळी पुलावरुन भरधाव वेगाने येणारी बाईक कारला धडकून अपघात झाला, ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. कार चालक अमित कुमार हा घटनेनंतर फरार झाला होता. मात्र सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून पोलिसांनी गाडी शोधली आणि त्याला अटक करण्यात आली आहे. एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं होतं?

संबंधित घटना ही बुधवारी (29 सप्टेंबर) रात्री लोअर परेल पश्चिमेकडील ब्रिजवर घडली होती. कार चालकाने ब्रिजवर अचानक वेगात यू टर्न घेतला. कार चालक अचानक वळल्याने दुचाकी चालक तरुण गोंधळात पडला. त्याने बाजूने दुचाकी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण कारच्या मागचा भाग त्याला लागला. त्यामुळे दुचाकी कारसह फरफटत पुढे गेली होती. कार चालक न थांबता तसाच पुढे निघून गेला.

यावेळी दुचाकीवर असलेल्या दोघा जणांचा बळी गेला. 25 वर्षीय कृष्णा कुर्हाडकर याच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला, तर जखमी तरुणावर मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या घटनेनंतर कार चालक पळून गेला. पण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटने प्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून तपासात हयगय केला जात असल्याचा आरोप मयत तरुणांच्या संतप्त नातेवाईकांना केला होता.

पाहा व्हिडीओ :

हेही वाचा :

VIDEO : मुंबईच्या लोअर परळ ब्रिजवर अचानक युटर्न घेतल्याने मोठा अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू, घटनेचा थरारक व्हिडीओ समोर

VIDEO : पैशांचा माज, कारचालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं, मुंबईतील धक्कादायक घटना