मुंबईत 40 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या, पत्नी-मुलं घरात नसताना गळफास

सुरेश चव्हाण हे ठाण्यातील मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये तैनात होते. रविवारी रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांची पत्नी दोन मुलांसह भावाकडे गेली होती. रात्री उशिरा तिघं घरी आले, तेव्हा दरवाजा वाजवूनही बराच वेळ आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

मुंबईत 40 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या, पत्नी-मुलं घरात नसताना गळफास
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 8:58 AM

मुंबई : 40 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. अंधेरी भागात राहणाऱ्या सुरेश चव्हाण यांनी पंख्याला गळफास घेऊन आयुष्य संपवलं. चव्हाणांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

नेमकं काय घडलं?

सुरेश चव्हाण हे ठाण्यातील मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये तैनात होते. रविवारी रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांची पत्नी दोन मुलांसह भावाकडे गेली होती. रात्री उशिरा तिघं घरी आले, तेव्हा दरवाजा वाजवूनही बराच वेळ आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या पत्नीने दरवाजा तोडला, तेव्हा सुरेश चव्हाण हे खोलीतील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडले.

आत्महत्येचं कारण अस्पष्ट

सुरेश चव्हाण यांनी गळफास घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत या प्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे.

घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल सुरेश चव्हाण यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही समजलेलं नाही.

नागपुरातही विद्यार्थ्याची आत्महत्या

दुसरीकडे, मेरिटचा विद्यार्थी असलेल्या आणि नेहमीच दूरदर्शी विचार मांडणाऱ्या एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. प्रद्युम्न मयुरेश चेंडके (वय 19 वर्ष) असं आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव आहे. घरची मंडळी झोपल्यानंतर राहत्या घरातच त्याने आयुष्याची अखेर केली. नागपूर एमआयडीसीतील लक्ष्मी पार्क सूतगिरणी (वाघधरा) परिसरात ही घटना उघडकीस आली.

प्रद्युमनने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र चेंडके कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रद्युम्नच्या बहिणी शोकसागरात बुडाल्या आहेत. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

मोबाईल स्पीकरवर गाणं लावून राहत्या घरात गळफास, नाशकात 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या

रक्षाबंधनालाच बहिणींच्या मनाला चटका, नागपुरात 19 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

Non Stop LIVE Update
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.