AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sandhya Singh | जतीन-ललितच्या बहिणीची झालेली हत्या, मुलानेच मृतदेह अ‍ॅसिडमध्ये विरघळवल्याचा होता संशय

संध्या सिंग गतकाळातील अभिनेत्री सुलक्षणा पंडित आणि विजेता पंडित, तसेच संगीतकारद्वयी जतीन ललित यांची बहीण. नवी मुंबईच्या सीवूड्स भागातील आलिशान घरातून डिसेंबर 2012 मध्ये संध्या सिंग बेपत्ता झाल्या होत्या. दीड महिन्यांनी त्यांचे अवशेष सापडले होते

Sandhya Singh | जतीन-ललितच्या बहिणीची झालेली हत्या, मुलानेच मृतदेह अ‍ॅसिडमध्ये विरघळवल्याचा होता संशय
रघुवीर (डावीकडे), संध्या सिंग (मध्यभागी) आणि जतीन-ललित
| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 8:01 AM
Share

मुंबई : गतकाळातील अभिनेत्री सुलक्षणा पंडित आणि विजेता पंडित यांची बहीण संध्या सिंग (Sandhya Singh) यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. नवी मुंबईच्या सीवूड्स भागातील आलिशान घरातून डिसेंबर 2012 मध्ये संध्या सिंग बेपत्ता झाल्या होत्या. जवळपास दीड महिन्याने त्यांच्या शरीराचे अवशेष घरापासून 200 मीटर अंतरावर असलेल्या दलदलीत सापडले होते. संध्या सिंग यांचा मुलगा रघुवीर उर्फ भोला यानेच आईची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता, मात्र नंतर त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

रघुवीर हा अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता. आपली व्यसनं पूर्ण करण्यासाठी तो घरातून पैसेही चोरायचा, असा दावा संध्या सिंग यांचे शेजारी आणि घरकाम करणाऱ्या दोन महिलांनी केला होता. पैशांवरुन रघुवीरचे आईशी वारंवार खटके उडायचे, तो आईला धमकवायचा, असे त्यांनी पोलिसांना सांगितले होते. मात्र परिस्थितीजन्य पुरावे अपुरे ठरुन पोलिसांना भक्कम पुरावे गोळा करण्यात अपयश आले. त्यामुळे 2015 मध्ये हायकोर्टाने रघुवीरला जामीन मंजूर केला होता. त्यावेळी 22 वर्षांच्या असलेल्या रघुवीरला काही महिन्यांपूर्वीच ठाणे कोर्टाने आईच्या हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले.

संध्या सिंग कोण होत्या?

संध्या सिंग गतकाळातील अभिनेत्री सुलक्षणा पंडित आणि विजेता पंडित, तसेच संगीतकारद्वयी जतीन ललित यांची बहीण. त्यांचे पती इंदूर येथील केंद्रीय उत्पादन शुल्क, सीमाशुल्क आणि सेवा कर विभागात त्यावेळी आयुक्त होते.

नेमकं काय घडलं होतं?

13 डिसेंबर 2012 रोजी संध्या सिंग नेरुळमधील बँकेत पैसे जमा करण्यासाठी आपल्या मैत्रिणीसोबत गेल्या होत्या. घरात तीस हजार रुपये आणि सोन्याचे दागिने ठेवले, तर रघुवीर ते चोरेल, अशी भीती त्यांना वाटत असल्याचं म्हटलं जातं. मात्र बँक बंद असल्यामुळे त्यांना तसंच परत यावं लागणार होतं. परंतु नेरुळला आलोच आहोत, तर जवळच राहणाऱ्या दुसऱ्या मैत्रिणीकडेही जावं, असा विचार त्यांनी केला. तिथून दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्या आपल्या घरी परतल्या. मात्र तेव्हापासून त्या बेपत्ता होत्या.

दरम्यान, संध्या सिंग घरी परतल्यानंतर रघुवीरनेच आपल्या आईची गळा आवळून हत्या केल्याचा दावा केला गेला. पैसे आणि दागिन्यांवरुन वाद झाल्यानेच रघुवीरने टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. याआधीही रघुवीरने आईचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे सुरुवातीपासूनच संशयाची सुई त्याच्यावर होती.

बाथटबमध्ये अ‍ॅसिड घालून मृतदेह विरघळवला

धक्कादायक म्हणजे बाथटबमध्ये अ‍ॅसिड घालून त्याने आईचा मृतदेह विरघळवल्याचाही आरोप झाला होता. त्यानंतर नवी मुंबईच्या सीवूड्स भागातील एनआरआय कॉम्प्लेक्सच्या जवळ असलेल्या दलदलीत त्याने सांगाड्याचे तुकडे टाकले, असा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला होता. दोन ब्रिटीश पक्षी संशोधकांना 45 दिवसांनी (28 जानेवारी 2013) संध्या सिंग यांच्या मृतदेहाचे अवशेष (कवटी आणि सात हाडं) सापडले होते. त्यानंतर संध्या सिंग यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संध्या सिंग बेपत्ता झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी रघुवीरने पार्टी केल्याचा दावा करण्यात आला होता. शेजारी-घरकाम करणाऱ्या महिलांची जबानी आणि रघुवीरच्या वर्तनातून वर्षभराने पोलिसांनी त्याला अटक केली होती. संध्या यांना त्यांच्या मैत्रिणीने बँकेबाहेर सोडले, तेव्हा त्यांनी हातात जे घड्याळ घातले होते, ते पोलिसांनी जप्त केले. रघुवीरने ते घड्याळ मित्राच्या माध्यमातून 16 हजार रुपयांना विकल्याचे पोलीस तपासात समोर आले होते.

आठ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

दरम्यान, आठ वर्षांच्या कालावधीनंतर ठाण्यातील कोर्टाने रघुवीरची हत्या, दरोडा, पुरावे मिटवणे यासारख्या सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. हत्येच्या वेळी आपण उपस्थित असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचं त्याने कोर्टात सांगितलं होतं. हत्या कधी आणि कुठे झाली, तसेच मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली, हेही स्पष्ट नसल्याचं कोर्टात त्याच्या वतीने सांगण्यात आलं होतं. उलट आपल्या आईच्या मैत्रिणीसह पाच जणांनी तिची हत्या केल्याचा संशयही त्याने याचिकेतून व्यक्त केला होता.

संबंधित बातम्या :

पत्नीचा हनीट्रॅप प्रमाणे वापर, मुंबईतील दोन धनदांडग्यांच्या हत्या, सिमरन सूद-विजय पालांडे कसे लागले होते पोलिसांच्या हाती?

Amar Singh Chamkila | प्रेग्नंट पत्नीसह झालेली गायक अमरसिंग चमकिलाची हत्या, 33 वर्षांनंतरही गूढ कायम

...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.