बिर्याणीच्या दुकानात 16 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, अंबरनाथमध्ये खळबळ

अल्पवयीन मुलगा चार दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी दुकानात झोपलेला होता. त्यावेळी दुकान मालक उमर खान याने दुकानात येऊन त्याच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक अत्याचार केला.

बिर्याणीच्या दुकानात 16 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, अंबरनाथमध्ये खळबळ
अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 9:08 AM

अंबरनाथ : बिर्याणीच्या दुकानात काम करणाऱ्या एका 16 वर्षीय मुलावर त्याच्याच मालकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरामध्ये अल्पवयीन मुलावरील अत्याचाराचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी नराधम मालकाला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

अंबरनाथ पूर्व भागातील शिवाजीनगर परिसरात हाजी अली कॅटरर्स नावाचं बिर्याणीचं दुकान आहे. या दुकानात एक 16 वर्षांचा मुलगा काम करतो. हा मुलगा चार दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी दुकानात झोपलेला होता. त्यावेळी दुकान मालक उमर खान याने दुकानात येऊन त्याच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक अत्याचार केला.

पीडित मुलाचं डोकं भिंतीवर आपटत मारहाण

यानंतर पीडित मुलाने गावी असलेल्या आपल्या आईला फोन वरून याची माहिती दिली. त्यावरून मुलाच्या आईने मालक उमर खान याला या प्रकाराचा जाब विचारला असता, त्याला राग आला. त्यामुळे त्याने पीडित मुलाचं डोकं भिंतीवर आपटत त्याला जबर मारहाण केली.

मुलाचे दोन दात पडले

मारहाणीत पीडित अल्पवयीन मुलाचे दोन दातही पडले. दुसऱ्या दिवशी बिर्याणीच्या दुकानात आलेल्या एका ग्राहकाने पीडित मुलाला तुझा चेहरा का सुजला आहे? याबाबत विचारणा केली असता मुलाने त्याला आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.

20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

या ग्राहकाने शिवाजीनगर पोलिसांना या बाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पॉस्को कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी उमर खान याला तात्काळ बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


संबंधित बातम्या :

पुण्यात तेराव्या मजल्यावरून वेटरने मारली उडी; आत्महत्येपूर्वी केले फेसबूक लाईव्ह

ज्या ट्रकवर उदरनिर्वाह त्यालाच लटकलेला मृतदेह, हिंगोलीत ट्रकचालकाची आत्महत्या

20 गुंठे जमिनीसाठी डोंबिवलीत तरुणाची दगडाने ठेचून हत्या, चुलतभाऊ झारखंडमध्ये कसा सापडला?