Father Rapes Daughter | भिवंडीत पोटच्या मुलीवर बापाकडून बलात्कार, 14 वर्षांची पीडिता गरोदर

भिवंडीतील भोईवाडा चाळीत राहणाऱ्या बापाने आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार केला. मुलीची प्रकृती ठीक नसल्याने तिला तपासणीसाठी धामणकर नाका येतील सोनोग्राफी सेंटरमध्ये नेण्यात आले होते. त्यावेळी पीडिता गरोदर असल्याची धक्कादायक बाब समोर आली.

Father Rapes Daughter | भिवंडीत पोटच्या मुलीवर बापाकडून बलात्कार, 14 वर्षांची पीडिता गरोदर
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 8:45 AM

भिवंडी : बापाने आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याची लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने डॉक्टरांनी नराधम पित्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात ही माणुसकीला लाजवणारी घटना घडल्याची माहिती आहे. पीडिता केवळ 14 वर्षांची आहे.

काय आहे प्रकरण?

भिवंडीतील भोईवाडा चाळीत राहणाऱ्या बापाने आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार केला. मुलीची प्रकृती ठीक नसल्याने तिला तपासणीसाठी धामणकर नाका येतील सोनोग्राफी सेंटरमध्ये नेण्यात आले होते. त्यावेळी पीडिता गरोदर असल्याची धक्कादायक बाब समोर आली.

डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे प्रकरण उघडकीस

प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत डॉक्टरांनी अल्पवयीन मुलगी आणि तिच्या वडिलांना घेऊन थेट भोईवाडा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तात्काळ पीडितेच्या आईला बोलावून घेत तिच्यासमोर पीडितेकडे चौकशी केली. त्यावेळी पीडित मुलीने दोन महिन्यांपूर्वी आपल्या वडिलांनी शारीरिक अत्याचार केल्याचे सांगितले.

नराधम बापाला अटक

भोईवाडा पोलिसांनी नराधमाच्या विरोधात बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला

दुसरीकडे, भिवंडीत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह वेळीच रोखण्यात यश आलं आहे. हळदी समारंभ झाल्याचे लक्षात येताच अंगणवाडी सेविकेने चाईल्ड हेल्पलाईनवर तक्रार केल्याने महिला आणि बाल विकास विभागाने रविवारी होणारा बालविवाह रोखण्यात यश मिळवले.

संबंधित बातम्या :

पोटच्या गोळ्याला कुत्र्याच्या पिल्लाजवळ सोडलं, एक दिवसाच्या बाळासोबत रात्रभर काय काय घडलं?

जमिनीच्या वादातून तरुणाकडून भाला मारुन चुलत भावाची हत्या, हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणे महागात पडले, तरुणाची बेदम मारहाण करीत हत्या