डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर गँगरेप प्रकरण, आरोपींचा आकडा 33 वर, 28 जणांना बेड्या

प्रियकराने जानेवारी महिन्यात पीडित मुलीवर बलात्कार करत व्हिडीओ काढला होता. या व्हिडीओच्या आधारे पीडित अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर अनेक जणांनी बलात्कार केल्याची माहिती सध्या समोर आली आहे

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर गँगरेप प्रकरण, आरोपींचा आकडा 33 वर, 28 जणांना बेड्या
प्रातिनिधिक फोटो

डोंबिवली (ठाणे) : डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात आतापर्यंत 33 आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. यामधील 28 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर पाच आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

कालपर्यंत 26 जणांना पोलिसांनी अटक केली होती. आज आणखी दोघा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यामुळे डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या 28 वर गेली आहे. यामधील आरोपी नवी मुंबई, डोंबिवली येथे राहणारे असल्याची माहिती एसपी सोनाली ढोले यांनी दिली.

प्रियकराने बलात्कार करत व्हिडीओ बनवला, नंतर ब्लॅकमेल करत 29 जणांचा बलात्कार

प्रियकराने जानेवारी महिन्यात पीडित मुलीवर बलात्कार करत व्हिडीओ काढला होता. या व्हिडीओच्या आधारे पीडित अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर अनेक जणांनी बलात्कार केल्याची माहिती सध्या समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

घटना ऐकून पोलीसही हैराण

या घटनेमुळे डोंबिवली ग्रामीण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीने मानपाडा पोलीस ठाण्यात आपल्यावर 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरु असल्याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडित तरुणीला विश्वासात घेत चौकशी सुरु केली. या चौकशीमध्ये जी माहिती समोर आली ते ऐकून पोलीस हैराण झाले.

आरोपींचा पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार

जानेवारी महिन्यात पीडित तरुणीवर तिच्या प्रियकराने बलात्कार करत तिचा व्हिडीओ काढला होता. हा व्हिडीओ या तरुणाने आपल्या मित्रांना दाखवला. या व्हिडीओच्या आधारे आतापर्यंत 33 जणांनी या पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. बदलापूर, रबाळे, मुरबाड आणि डोंबिवलीत वेगवेगळ्या ठिकाणी तिला घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला गेला. मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत 28 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यामध्ये दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत.

कल्याणमध्ये चिमुकलीवर अत्याचार

दरम्यान, डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना कल्याणमध्ये देखील एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका शिकवणी चालविणाऱ्या शिक्षकाने अवघ्या 8 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या आईने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर संबंधित प्रकार उघड झाला. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपी मुदर तालवाला याला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

अवघ्या 15 वर्षाच्या मुलीवर 29 जणांकडून सामूहिक बलात्कार, पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार

डोंबिवलीची घटना ताजी असताना कल्याणमध्ये आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना

बॉयफ्रेण्डकडून बलात्काराचं व्हिडीओ शूट, 14 वर्षीय मुलीवर 31 जणांचा गँगरेप, डोंबिवलीत खळबळ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI