पत्नीने सोनोग्राफीसाठी पैसे मागितले, नवऱ्याकडून लेकीची हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न

आरोपी अनीस मालदार आपली पत्नी सोफिया आणि सात वर्षांच्या मुलीसोबत मुंब्रा बाजार भागातील बॉम्बे कॉलनीत असलेल्या अरसद मंजीलमध्ये राहत होता. तो मजुरी करायचा, मात्र त्याला जुगार खेळण्याची वाईट सवय जडली होती.

पत्नीने सोनोग्राफीसाठी पैसे मागितले, नवऱ्याकडून लेकीची हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न
crime News
| Edited By: | Updated on: Dec 05, 2021 | 11:25 AM

ठाणे : पैशांवरुन पत्नीशी वाद झाल्यानंतर नराधम पित्याने पोटच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर विष पिऊन स्वतःचाही जीव देण्याचा प्रयत्न बापाने केला. सात वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर आरोपी पित्याचा जीव वाचला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात ही घटना घडली. आरोपी बाप अनीस मालदार याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.

अनीस मालदार आपली पत्नी सोफिया आणि सात वर्षांच्या मुलीसोबत मुंब्रा बाजार भागातील बॉम्बे कॉलनीत असलेल्या अरसद मंजीलमध्ये राहत होता. तो मजुरी करायचा, मात्र त्याला जुगार खेळण्याची वाईट सवय जडली होती.

काय आहे प्रकरण?

पत्नी सोफिया नोकरी करुन कुटुंबाचं पोट भरण्यासाठी हातभार लावत होती. आर्थिक देवाणघेवाणी वरुन अनीस मालदार आणि सोफिया या दाम्पत्यामध्ये अनेक वेळा वाद विवाद झडत असत.

पैसे मागितल्याने भांडण

सोनोग्राफी करण्यासाठी गुरुवारी रात्री सोफियाने पती अनीसकडे पैशांची मागणी केली. मात्र त्याने पैसे नसल्याचं सांगत तिला स्पष्ट नकार दिला. त्यावर तिने मला सोड, आणि मुलीसोबत वेगळा रहा, असा इशारा दिला.

मुलीची हत्या करुन आत्महत्येचा प्रयत्न

बायकोचा पवित्रा पाहून अनीसचा तळतळाट झाला. त्याने रागाच्या भरात सात वर्षांच्या मुलीलाच जोरजोराने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दत्तूवाडी परिसरात जाऊन त्याने मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वतःही विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

संबंधित बातम्या :

Jawan Firing | सुट्टी नाकारल्याचा राग, जवानाचा वरिष्ठांवर गोळीबार, दोघांचा मृत्यू

प्रेमीयुगुलाची गळफास लावून आत्महत्या, भंडारा जिल्ह्यातील परसोडीतील घटना

स्नॅपचॅटवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, अहमदनगरात आरोपीला बेड्या