Molestation | स्नॅपचॅटवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, अहमदनगरात आरोपीला बेड्या

मुलगी क्लासला जाता असतानाआरोपी तिचा पाठलाग करत होता. यावेळी त्याने, 'माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू सोबत आली नाहीस, तर तुझ्या कुटुंबाला जीवे ठार मारेन' अशी धमकी दिल्याचा दावा केला जात आहे.

Molestation | स्नॅपचॅटवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, अहमदनगरात आरोपीला बेड्या
अहमदनगरमध्ये विनयभंग प्रकरणी आरोपीला अटक

अहमदनगर : सोशल मीडियावर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीचा आरोपीने विनयभंग केला. अहमदनगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे. विनयभंग प्रकरणातील आरोपीला कोतवाली पोलिसांनी तीन तासात बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

अहमदनगरमध्ये राहणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलीशी आरोपीची स्नॅपचॅट अॅपवर ओळख झाली होती. गिरीष सुनिल वरकड असं या आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी आपल्या घराच्या गॅलरीमध्ये उभी होती. त्यावेळी आरोपी वरकड याने मुलीला उद्देशून हातवारे केले आणि तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप आहे.

पाठलाग करुन धमकी

आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर तो मुलगी क्लासला जाता असताना तिचा पाठलाग करत होता. यावेळी त्याने, ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू सोबत आली नाहीस, तर तुझ्या कुटुंबाला जीवे ठार मारेन’ अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

अवघ्या तीन तासांच्या आत अटक

पोलिसांनी आरोपी गिरीष सुनिल वरकड याला अवघ्या तीन तासांच्या आत अटक केली असून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

वकिलीचा अभ्यास, मानसशास्त्रात पारंगत, सोशल मीडियावर महिलांना फसवायचा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दारुसाठी पैसे न दिल्याच्या रागातून एकाची हत्या, 12 तासांत आरोपींना बेड्या; वाहनांना लुटणारी टोळीही गजाआड

Kanpur Triple Murder | ओमिक्रॉन सर्वांचा जीव घेईल, डॉक्टर नवऱ्याकडून पत्नी आणि दोन मुलांची हत्या

Published On - 9:00 am, Sun, 5 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI