VIDEO | आईच्या बेदम मारहाणीत 2 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, विरारमधील घटना

मुलीच्या शव विच्छेदन अहवालावरून सोमवारी आरोपी आईच्या विरोधात विरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आईला अटक करण्यात आली आहे

VIDEO | आईच्या बेदम मारहाणीत 2 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, विरारमधील घटना
विरारमध्ये आईच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू


विरार : विरारमध्ये आईच्या मारहाणीत दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विरार पूर्व फुलपाडा परिसरातील पारिजात आपर्टमेंटमध्ये ही शनिवारी घटना घडली. या प्रकरणातील निर्दयी मातेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संतापाच्या भरात महिलेने हे कृत्य केल्याचा दावा केला जात आहे.

नेमकं काय घडलं

मुलीच्या शव विच्छेदन अहवालावरून सोमवारी आरोपी आईच्या विरोधात विरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आईला अटक करण्यात आली आहे. नेहा सोनुकुमार सोनी (वय 22 वर्ष) असे आपल्याच मुलीची हत्या करणाऱ्या आरोपी आईचे नाव आहे.

आरोपी महिलेचा पती हा रिक्षाचालक असून ती गृहिणी आहे. या दाम्पत्याला दोन्ही मुलीच आहेत. मृत्यू झालेली मुलगी मोठी होती, तर एका वर्षाची धाकटी मुलगी आहे. यात ती तिसऱ्यांदाही गरोदर आहे.
शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास नेहाने रागाच्या भरात आपल्या दोन वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण केली. त्यात ती बेशुद्ध झाली होती. तिने याची माहिती पतीला दिल्यानंतर मुलीला तात्काळ उचलून विरार पश्चिम ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.
वडिलांच्या तक्रारीवरून प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सोमवारी मुलीच्या शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तिच्या डोक्यावर, अंगावर अंतर्गत जखमा आढळून आल्याने तिला मारहाण झाले असल्याचे उघड झाले आहे. विरार पोलिसांनी शवविच्छेदन अहवालावरून तपास करून आई विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केले असल्याची माहिती विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे.
आरोपी आई ही नेहमी घरात भांडण करत होती. आपल्या मुलांनाही ती वारंवार बेदम मारहाण करत होती. मुलांच्या ओरडण्याने जर कोणी घरात शेजारी सोडवायला किंवा समजावयाला गेले तर त्यांनाही उलटसुलट बोलून हाकलून देत होती. त्यातच रागाच्या भरात तिच्या हातून एका मुलीची हत्या झाली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शेजाऱ्यांनी दिली आहे

पाहा व्हिडीओ :

विरारमध्ये अल्पवयीन कुमारी मातेकडून बाळाची हत्या

दुसरीकडे, विरारमध्ये इमारतीतून फेकलेल्या नवजात बाळाच्या मृत्यूचाही उलगडा झाला आहे. 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने हत्येची कबुली दिली. अल्पवयीन प्रेमी युगुलाच्या शारीरिक संबंधांतून मुलीचा जन्म झाला होता. त्यानंतर अल्पवयीन कुमारी मातेनेच आपल्या पोटच्या बाळाची इमारतीतून खाली फेकून हत्या केल्याचे समोर आले आहे.

16 वर्षांची मुलगी आणि 17 वर्षांचा मुलगा यांच्या शारीरिक सबंधातून बाळाचा जन्म झाला होता. सैल कपडे घालून तिने आपल्या कुटुंबीयांपासून प्रेग्नन्सी लपवली होती. मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास तिने बाथरुममध्ये बाळाला जन्म दिला. त्यानंतर पकडलं जाण्याच्या भीतीने दुसऱ्या मजल्यावरील घराच्या खिडकीतूनच तिने बाळाला खाली फेकलं होतं.

संबंधित बातम्या :

प्रेम प्रकरणातून जन्मलेल्या बाळाला कुमारी मातेनेच विहिरीत फेकलं, पाण्यात बुडून मृत्यू

विरारमधील नवजात अर्भकाच्या हत्येचा उलगडा, अल्पवयीन युगुलाच्या संबंधातून जन्मलेले बाळ

रुमालाने तान्हुल्या बाळाला पोटाशी बांधले, 23 वर्षीय विवाहितेची विहिरीत आत्महत्या

बाळाचं अपहरण, नंतर हत्या करुन खाडीत पुरलं, पैसे दिले नाही म्हणून तृतीयपंथीचं अमानवीय कृत्य

(Virar Mother beaten up own two years old daughter to death)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI