Mumbai Crime: मुंबई हादरली! मालाडमध्ये 8 वर्षांच्या चिमुकलीवर…घटनेनंतर सर्वत्र संताप!

Malad Crime: मालाडमध्ये 8 वर्षांच्या चिमुकलीवर फावड्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर मालाड पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

Mumbai Crime: मुंबई हादरली! मालाडमध्ये 8 वर्षांच्या चिमुकलीवर...घटनेनंतर सर्वत्र संताप!
Malad
Updated on: Oct 26, 2025 | 6:56 PM

मुंबईतील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मालाडमध्ये 8 वर्षांच्या चिमुकलीवर फावड्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर मालाड पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. शनिवारी दुपारी 2 वाजका ही घटना घडली आहे. चिमुकलीवर झालेल्या या हल्ल्यानंतर आता सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

34 वर्षीय व्यक्तीचा चिमुकलीवर हल्ला

समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 3 वाजता 8 वर्षांची मुलगी तबेल्याजवळ खेळत होती. त्यावेळी 34 वर्षीय अजय यादव हा या मुलीला चिडवत होता. चिडवल्यामुळे मुलीनेही त्याला बोलायला सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने शेण गोळा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टीलच्या फावड्याने मुलीच्या चेहऱ्यावर हल्ला केला. या हल्यात मुलगी जखमी झाली आहे. त्यामुळे आरोपीवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आरोपीला अटक करण्याची मनसेची मागणी

या घटनेनंतर मालाड पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र काही वेळानंतर पोलीसांनी आरोपींला सोडून दिले. त्यानंतर आज मनसे विभाग प्रमुख दिनेश साळवी यांनी आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती. ते या मागणीसाठी कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र ते तिथे पोहोचण्यापूर्वीच पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपीवर गुन्हा दाखल

याबाबत बोलताना मनसे विभाग प्रमुख दिनेश साळवी म्हणाले की, ‘पोलीसांनी 8 वर्षांच्या मुलीवर फावड्याने हल्ला करणाऱ्या आरोपीला नोटीस दिल्यानंतर सोडून दिले होते. मात्र आता पोलीसांनी सांगितले आहे की आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि आरोपीविरुद्ध कलम 118 भाग 2 जोडण्यात येत आहे.’

दरम्यान, या घटनेनंतर मालाडमध्ये संतापाची लाट उसळली आहे, नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पोलीसांनी सुरुवातीला आरोपीला सूट दिली होती, मात्र आता मनसेच्या दणक्यानंतर आरोपीला पुन्हा बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांनी योग्य उपाययोजना करणे गरजेचे असल्याते मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.